तुळजापूर:- तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाल्याने मंगरुळ गटात व पंचायत समिती गणातील राजकीय समीकरणात बदल झाले आहेत.
मंगरुळ पंचायत समिती गणात जनसेवेसाठी सदैव तत्पर असलेले कै.सुरेशराव डोंगरे यांच्या पत्नी शिवसेना (उबाठा) युवासेना तालुका प्रमुख तथा संचालक ख. वि. संघ तुळजापूर सर्वसमावेशक नेतृत्व विरेश सुरेशराव डोंगरे यांच्या मातोश्री श्रीमती सुरेखा सुरेशराव डोंगरे यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ गट,पंचायत समिती गण 2017 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेला होता.त्यानंतर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने या गटातील जिल्हा परिषद सदस्या अस्मिता कांबळे व पंचायत समिती सदस्य चित्तरंजन सरडे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्याने सध्या या गटात भाजपचे प्राबल्य मानले जाते.परंतु यंदा मंगरुळ जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाल्याने शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील हे तुळजापूर तालुक्यात व सर्व जिल्हा परिषद गटाकडे जास्त लक्ष देऊन जास्तीत जास्त जागा महाविकास आघाडीकडे खेचून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्यामुळे मंगरुळ जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात तुल्यबळ लढत होणार असल्याचे चित्र आहे.
शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते व खासदार ओमराजे निंबाळकर यांचे कट्टर समर्थक शिवसेना (उबाठा) युवासेना प्रमुख विरेश सुरेशराव डोंगरे यांनी सामाजिक कार्याच्या माध्यमातून तळागाळातील जनतेपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी शिलाई मशीनचे वाटप, लघुउद्योगांना चालना देणे,आरोग्य सेवा,क्रिडा प्रोत्साहन तसेच विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप यासारखे विविध उपक्रम राबवून जनतेचा विश्वास संपादन केला आहे. सध्या विरेश डोंगरे यांच्या कार्याने युवक वर्ग त्यांचेकडे आकर्षित झाला असून फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हाट्सअप ग्रुपवर त्यांच्या नावाची पोस्ट प्रचंड व्हायरल होत असून मंगरुळ पंचायत समिती गण सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाल्याने या मतदार संघातून पंचायत समिती गणातून शिवसेना (उबाठा) पक्षातून विरेश डोंगरे यांच्या मातोश्री श्रीमती सुरेखा सुरेशराव डोंगरे यांच्या नावाची जोरदार चर्चा असून पक्षश्रेष्ठी कोणाला उमेदवारी देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 Comments