येणेगुर/प्रतिनिधी
उमरगा तालुक्यातील महालिंगरायवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक प्रशालेत राजश्री छत्रपती शाहू महाराज व परमवीर चक्र विजेते राम राघोबा राणे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रारंभी दोन्ही प्रतिमेचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक ईश्वर नांगरे व सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत करण्यात आले.
याप्रसंगी शाळेतील शिक्षिका निर्मला यादव यांनी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन कार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली तसेच परमवीर चक्र विजेते राम राघोबा राणे यांच्या पराक्रमाची ही माहिती यादव मॅडम यांनी विद्यार्थ्यांना दिली.
याप्रसंगी शाळेतील शिक्षक परमेश्वर ननवरे यांनीही राजश्री छत्रपती शाहू महाराज व परमवीर चक्र विजेते राम राघोबा राणे यांच्या जीवन चरित्रा विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
कार्यक्रमाची सांगता समारोप अध्यक्षीय भाषणाने शाळेचे मुख्याध्यापक ईश्वर नांगरे यांनी केले.
याप्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थी तसेच किरण चौधरी निर्मला यादव संगीता डोकडे निर्मला भोसले परमेश्वर ननवरे हे शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाविन्यपूर्ण रीतीने प्रज्ञा पाटील यांनी केले व आभार सई घोरपडे यांनी मांडले.
0 Comments