काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील सरस्वती विद्यालयात गुरुवार दि. 27 जुन रोजी एस.टी. महामंडळाच्या तुळजापूर आगाराचे आगार व्यवस्थापक राम शिंदे व वाहतूक नियंत्रक राजशेखर कोंडे यांनी प्रत्यक्ष विद्यालयात येऊन "एसटी पास थेट तुमच्या शाळेत" या उपक्रमाद्वारे शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत सरस्वती विद्यालयात माळुंब्रा, पांगरदरवाडी, सांगवी (काटी), व गंजेवाडी येथून शिक्षणासाठी येणाऱ्या इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या 60 विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण करण्यात आले. यापुर्वी यासाठी विद्यार्थिनींना एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभा राहून पास घ्यावे लागत होते किंवा गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापन कडून पास घेतले जात होते.
सरस्वती विद्यालयात येऊन तुळजापूर आगाराच्या वतीने 60 विद्यार्थींना पासचे वितरण केले या स्तुत्य उपक्रमाबद्दल तुळजापुर आगार व्यस्थापक राम शिंदे व वाहतूक नियंत्रक राजशेखर कोंडे यांचे कौतुक करुन विद्यालयाचे प्राचार्य सुहास वडणे,पर्यवेक्षक औदुंबर माडजे औंदुबर,पास विभाग प्रमुख पाटील सर,सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक यांनी आभार मानून धन्यवाद व्यक्त केले.
0 Comments