Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीवर महायुतीचाच झेंडा फडकवा....बसवराज पाटील भुसणीतून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक प्रचाराचा शुभारंभ

मुरूम/प्रतिनिधी
 जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारार्थ उमरगा तालुक्यातील भुसणी येथील हनुमान मंदिराचे दर्शन घेऊन भाजपचे नेते बसवराज पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून शुभारंभ शुक्रवारी (ता.३०) रोजी करण्यात आला. 

याप्रसंगी बसवराज पाटील म्हणाले की, सध्या राज्यावर उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार यांच्या निधनाने दुःखाचे सावट पसरले आहे. अशा परिस्थितीत आपल्याला या निवडणुकांना सामोरे जावे लागत आहे. धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला अधिक गती द्यायची असेल, तर जिल्हा परिषद व पंचायत समितीवर महायुतीचाच झेंडा फडकवणे आवश्यक आहे. भुसणी गावाशी पाटील कुटुंबाचे असलेले जिव्हाळ्याचे संबंध अधोरेखित करून सन १९८५ च्या निवडणुकीत भुसणीकरांनी स्व. काझी साहेबांना भरघोस मताधिक्य देऊन विजयी केल्याच्या आठवणींना उजाळा दिला.

भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अप), रिपाई (अ) व लहुजी शक्ती सेना महायुतीचे दाळींब गटाचे अधिकृत उमेदवार रफिक तांबोळी, गणाचे उमेदवार अमर वाले, भुसणी गणाचे उमेदवार कैलास शिंदे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

यावेळी ज्ञानराज चौगुले, शरण पाटील, कैलास शिंदे, रफिक तांबोळी आदींची भाषणे झाली. या प्रचार सभेस मुरूमचे नगराध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, उमरगा-लोहारा तालुक्याचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले, उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण पाटील, भाजप अनुसूचित मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेराव, शिवलिंग माळी, धनराज हिरमुखे, मल्लिनाथ हिरमुखे, गंपय्या स्वामी, प्रशांत गायकवाड, श्रीमंत पाटील, धुळप्पा पाटीप, शिवाजी संगशेट्टी, राजेंद्र व्हनाजे, बाबुराव बनसोडे, बालाजी संगशेट्टी, दशरथ माळी, धुळप्पा पाटील, महादेव पाटील, दिगंबर पांचाळ आदींची उपस्थिती होती. प्रारंभी कै. अजितदादा पवार यांना सामुदायिक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून कोणताही सत्कार न स्वीकारता थेट सभेला सुरुवात करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात आयोजित या सभेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद राहिला.

Post a Comment

0 Comments