'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
दि. १९ जून
ग्रामीण आणि निमशहरी भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी आणि शाळांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी 'बालाजी अमाईन्स' आणि 'बालाजी स्पेशालिटी केमिकल्स' यांनी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) अंतर्गत एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील एकूण २८ जिल्हा परिषद व अनुदानित शाळांना अत्याधुनिक शालोपयोगी साहित्याचे एका दिमाखदार सोहळ्यात वितरण करण्यात आले. या मदतीमुळे ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची दारे खुली होणार आहेत.
बालाजी अमाईन्सच्या मुख्य कार्यालयात शुक्रवार दि. १९ जून रोजी हा कौतुकास्पद वितरण सोहळा पार पडला. याप्रसंगी बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री. राम रेड्डी यांच्या शुभहस्ते सोलापूर जिल्ह्यातील २० शाळांना आणि धाराशिव जिल्ह्यातील ८ शाळांना शालेय साहित्याचे अधिकृत वाटप करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने ७ शाळांना ७ स्मार्ट टीव्ही, १० शाळांना १० संगणक व १ इंटरॲक्टिव्ह बोर्ड, तर ११ शाळांना २२५ बेंचेसचा समावेश आहे.
ग्रामीण भागात डिजिटल क्रांतीचे पर्व
या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना व्यवस्थापकीय संचालक श्री. राम रेड्डी यांनी सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील शैक्षणिक विकासासाठी बालाजी अमाईन्स सदैव कटिबद्ध असल्याचे आवर्जून सांगितले. कंपनीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांची माहिती त्यांनी शिक्षक व मुख्याध्यापकांना दिली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सीएसआर विभागप्रमुख अनिल विपत यांनी केले. त्यांनी सर्व पाहुण्यांचे व शिक्षकांचे मनापासून स्वागत करून सीएसआर उपक्रमांमागील कंपनीची भूमिका स्पष्ट केली.
'सर फाऊंडेशन'कडून दातृत्वाचे कौतुक
'सर फाऊंडेशन'चे श्री. सिद्धाराम माशाळे सर यांनी बालाजी अमाईन्सच्या या दातृत्वाचे तोंडभरून कौतुक केले. ते म्हणाले, "जिल्हा परिषदेच्या शाळांना स्मार्ट टीव्ही, संगणक आणि बेंच मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक सोय तर होईलच, शिवाय ग्रामीण भागातील मुलेही आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रवाहात आत्मविश्वासाने उभी राहतील." त्यांनी सर्व २८ शाळांच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक श्री. राम रेड्डी आणि बालाजी उद्योग समूहाचे विशेष आभार मानले.
या भव्य सोहळ्यास सर फाऊंडेशनचे श्री. बाळासाहेब वाघ सर, बालाजी अमाईन्सचे दत्तप्रसाद सांजेकर, अमोल गुंड यांच्यासह दोन्ही जिल्ह्यांतून आलेले मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साहित्य मिळालेल्या शाळांची सविस्तर यादी
■ सोलापूर जिल्हा (एकूण २० शाळा)
संगणक १ व इंटरॲक्टिव्ह बोर्ड:
१. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मोरवंची
संगणक वितरण (५ शाळा):
१. पुण्यश्लोक विद्यालय, हिंगणी (ता. मोहोळ)
२. ओंकार मराठी प्राथमिक शाळा, मांजरेवाडी
३. श्री सिद्धेश्वर प्राथमिक शाळा, कुमठे साखर कारखाना
४. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुडल (ता. दक्षिण सोलापूर)
५. स्वामी विवेकानंद प्रशाला, सोलापूर
स्मार्ट टीव्ही वितरण (६ शाळा):
१. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुमठे
२. नगरपालिका मुलींची शाळा नं. २, अक्कलकोट
३. जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळा, सुलेरजवळगे
४. संभाजीराव चव्हाण माध्यमिक विद्यालय, विठ्ठलवाडी
५. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कारकल (ता. दक्षिण सोलापूर)
६. रोशन प्रशाला, सोलापूर
सुसज्ज बेंच वितरण (१४५ बेंच - ७ शाळा):
१. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वडकबाळ (२० बेंच)
२. म.न.पा. उर्दू मुलींची शाळा, सोलापूर (२० बेंच)
३. चंद्रभागाबाई यलगुलवार प्राथमिक शाळा, सोलापूर (२० बेंच)
४. श्री सोमेश्वर हायस्कूल, हत्तूर (ता. दक्षिण सोलापूर - २० बेंच)
५. सिद्धार्थ मराठी विद्यालय, मुळेगाव (२५ बेंच)
६. लोकनेते के. बाबुरावअण्णा पाटील विद्यालय, हिवरे (ता. मोहोळ - २० बेंच)
७. मूकबधिर शाळा, टेंभुर्णी (ता. माढा - २० बेंच)
■ धाराशिव जिल्हा (एकूण ८ शाळा)
संगणक वितरण (४ शाळा):
१. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, दिंडेगाव (ता. तुळजापूर)
२. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सलगरा दि. (ता. तुळजापूर)
३. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बेलवाडी (ता. लोहारा)
४. ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन, नळदुर्ग (ता. तुळजापूर)
स्मार्ट टीव्ही वितरण (१ शाळा):
१. जिल्हा परिषद सेकंदरी हायस्कूल, मस्सा (ता. कळंब)
सुसज्ज बेंच वितरण (३ शाळा - एकूण ६० बेंच):
१. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिंपळा खुर्द (ता. तुळजापूर - २० बेंच)
२. जिल्हा परिषद बॉईज हायस्कूल, नळदुर्ग (ता. तुळजापूर - २० बेंच)
३. नरेंद्र बोरगावकर माध्यमिक प्रशाला, देवकुरळी (ता. तुळजापूर - २० बेंच)
0 Comments