Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा | विशेष लेख लोकसंग्रह, संघर्ष आणि विकासाचा ध्यास: तुळजापूरच्या जनमानसातील कणखर नेतृत्व तथा शिवसेना शिंदे गटाचे नेते देवानंद (भाऊ) रोचकरी यांचा आज वाढदिवस...विशेष लेख:

'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
तुळजापूर | उमाजी गायकवाड 
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या पावन नगरीला केवळ धार्मिकच नव्हे, तर वैशिष्ट्यपूर्ण राजकीय आणि सामाजिक इतिहास लाभला आहे. या नगरीच्या आधुनिक जडणघडणीत आणि राजकीय पटलावर गेल्या काही दशकांत ज्या नेत्यांनी आपल्या कर्तृत्वाने आणि संघर्षाने स्वतःचे अढळ स्थान निर्माण केले, त्यात तुळजापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे धडाडीचे नेते देवानंद (भाऊ) साहेबराव रोचकरी यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त, त्यांच्या चढ-उतारांनी भरलेल्या राजकीय प्रवासाचा आणि सामाजिक बांधिलकीचा "Only न्युज धाराशिव वृत्तसेवेने घेतलेला हा वेध...

'भाऊ'  हीच ओळख, काम हीच पूजा
देवानंद भाऊंची ओळख केवळ एक राजकीय नेता अशी नाही, तर ते प्रत्येक तुळजापूरकरांसाठी 'भाऊ' आहेत. नगराध्यक्षपदाच्या काळात त्यांनी शहराच्या विकासाला नवी दिशा दिली. रस्ते, पाणी, स्वच्छता, दिवाबत्ती यांसारख्या मुलभूत प्रश्नांवर त्यांनी कायम भर दिला. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांचे दार २४ तास खुले असते. पक्ष कोणताही असो, मदत मागायला येणाऱ्या प्रत्येकाला 'भाऊ' आपले मानतात, हाच त्यांच्या मोठेपणाचा गाभा आहे.

संघर्षातून तावून-सुलाखून निघालेले नेतृत्व
राजकारण हा गुलाबांचा बिछाना नाही, तर काट्यांची वाट आहे, याची प्रचिती देवानंद भाऊ यांच्या एकूण कारकिर्दीकडे पाहताना येते. विद्यार्थी दशेपासूनच सामाजिक कार्याची आवड असलेल्या भाऊंनी जनसेवेलाच आपल्या आयुष्याचे ध्येय मानले. त्यांच्या या प्रवासात अनेक राजकीय स्थित्यंतरे आली. योग्य संधी न मिळाल्याने झालेला पक्षबदल, निवडणुकांमधील पराभव आणि राजकीय समीकरणांमुळे काही अत्यंत जवळच्या सहकाऱ्यांनी सोडलेली साथ... अशा अनेक वादळांचा त्यांनी सामना केला.

परंतु, पराभवाने खचून न जाता आणि कोणत्याही परिस्थितीला न डगमगता ते पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेत राहिले. 'लोकांशी दिलेला शब्द हाच आपला अजेंडा' मानून काम केल्यामुळेच, राजकीय पटलावर अनेक चढ-उतार अनुभवूनही त्यांचे नेतृत्व अधिक परिपक्व आणि कणखर बनले आहे.

'देवराज मित्र मंडळ' ते 'नगराध्यक्षपद': विकासाचे पर्व
तुळजापूर तालुक्याच्या ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांशी भाऊंची नाळ अत्यंत घट्ट जोडलेली आहे. तालुक्यातील गावागावांत त्यांनी 'देवराज मित्र मंडळा'ची स्थापना करून स्थानीय आणि सामाजिक प्रश्न सोडवण्यास सुरुवात केली. कोणाचाही वैयक्तिक किंवा सार्वजनिक प्रश्न असो, तो आपलाच आहे या भावनेने ते धावून जातात.

त्यांच्या याच अहोरात्र कष्टातून आणि प्रचंड जनसंपर्कातून त्यांनी तुळजापूर नगर परिषदेचे नगराध्यक्षपद भूषवले. या कार्यकाळात त्यांनी शहराच्या मूलभूत रचनेला आकार दिला:

रस्ते, पाणी, स्वच्छता आणि दिवाबत्ती या प्रश्नांचा कायमस्वरूपी निपटारा.

आई तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यासाठी शासन दरबारी सातत्यपूर्ण पाठपुरावा.

यात्रोत्सवाच्या काळात लाखो भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी स्वतः रस्त्यावर उतरून केलेले चोख नियोजन.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे शिलेदार आणि पुढची पिढी
बाळासाहेब ठाकरकरांच्या विचारांवर निष्ठा ठेवून राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणारे देवानंद भाऊ सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'सामान्य माणूस केंद्रबिंदू' या संकल्पनेवर विश्वास ठेवून शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे जिल्ह्यात खंबीरपणे नेतृत्व करत आहेत. पक्षवाढीसाठी गावोगावी कार्यकर्त्यांचे जाळे विणण्यात आणि कार्यकर्त्यांच्या संकटकाळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.

विशेष म्हणजे, भाऊंचा हाच राजकीय आणि सामाजिक वारसा त्यांची पुढची पिढी तितक्याच समर्थपणे पुढे नेत आहे:

सौ. सीमाताई भैरवनाथ माडजे (रोचकरी): यांनी बहुचर्चित मंगरुळ जिल्हा परिषद गटातून मातब्बर उमेदवाराचा पराभव करत विजय मिळवला.

कृष्णा (भैय्या) रोचकरी: (युवा प्रदेशाध्यक्ष, समाजवादी पार्टी) यांनी आरळी बुद्रुक पंचायत समिती गणातून दणदणीत विजय मिळवला. (महाराष्ट्रातून एकाच वेळी विजयी होणारी ही एकमेव बहीण-भावाची जोडी ठरली).

गणेश (दादा) रोचकरी: यांनी तालुक्यात तरुणांची मोठी फळी उभारली असून, त्यांची नुकतीच शिवसेना मुख्य नेत्यांच्या आदेशानुसार तुळजापूर विधानसभा युवासेना संपर्क प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. यामुळे तालुक्यातील युवा चळवळीला मोठी उभारी मिळाली आहे.

सामाजिक बांधिलकीचे भान
केवळ सत्ताकारण न करता समाजकारणाचा वस्तुपाठ भाऊंनी घालून दिला आहे. रक्तदान शिबिरे, छत्रपती संभाजी महाराज जयंती, ग्रामीण भागातील नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण त्यांचे नागरिकांसाठी सुरु असलेले कार्य तुळजापूरकर कधीही विसरू शकणार नाहीत. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्तही तालुक्यातील देवराव मित्र परिवार, सहकारी,नातेवाईक, मित्र परिवार तुळजापूर येथील जुन्या बसस्थानक समोरील कार्यालयात भव्य अभिष्टचिंतन सोहळा पार पडणार आहे.

दीर्घायुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
एक लढवय्या, शब्दाला जागणारा आणि २४ तास जनतेसाठी दारे उघडी ठेवणारा लोकनेता म्हणून देवानंद (भाऊ) रोचकरी यांचे कार्य कौतुकास्पद आहे.

'Only न्युज धाराशिव' परिवाराचे मुख्य संपादक उमाजी गायकवाड व गायकवाड परिवार (काटी, ता. तुळजापूर) यांच्या वतीने लाडके भाऊसाहेब देवानंद रोचकरी यांना वाढदिवसाच्या अनंत भगव्या शुभेच्छा! आई तुळजाभवानी त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि जनसेवेसाठी अधिक शक्ती प्रदान करो, हीच प्रार्थना!

Post a Comment

0 Comments