Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

श्री विठ्ठलसाई कारखान्यात रोलर पूजन संपन्न: सर्व ऊसाचे वेळेवर गाळप करणार - आ. बसवराज पाटील


'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
मुरुम | प्रा.डॉ. सुधीर पंचगल्ले
श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना, मुरुम येथील २०२६-२७ या आगामी गळीत हंगामासाठीच्या रोलर पूजन समारंभ माजी मंत्री तथा कारखान्याचे चेअरमन मा. आ. श्री. बसवराज पाटील यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडला.

या प्रसंगी बोलताना बसवराज पाटील म्हणाले की, "सध्या कारखाना कार्यक्षेत्रात साधारणतः १८,००० हेक्टर क्षेत्रावर ऊसाची लागवड झाली आहे. यंदा पर्जन्यमान अपुरे असले, तरी कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर ऊस उपलब्ध आहे. २०२६-२७ च्या हंगामात क्षेत्रातील संपूर्ण ऊसाचे वेळेवर गाळप केले जाईल."

गळीत हंगाम सुरळीत पार पाडण्यासाठी सक्षम ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा सज्ज करण्यात आली असून मशिनरी दुरुस्तीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांनी कारखान्याला जास्तीत जास्त ऊस देवून सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

या कार्यक्रमास मुरुम नगरपरिषदेचे नगराध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापुरावजी पाटील, उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमन शरणजी पाटील, संचालक सर्वश्री शरण्णप्पा पत्रिके, केशवराव पवार, शिवलिंग माळी, रवींद्र चव्हाण, गणेश अंबर, नागनाथ पत्रिके, ॲड. विश्वनाथ पत्रिके, सुजित शेळके, बबन बनसोडे, सतीश पवार, संजीव पाटील, शाहूराज डोके, प्रकाश आष्टे, सचिन पाटील, नितीन रेड्डी, उमाकांतप्पा शेटे यांच्यासह कार्यकारी संचालक एस. आर. गवसाणे, कारखान्याचे सर्व अधिकारी, कामगार व ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुरुम येथील श्री विठ्ठलसाई कारखान्यात २०२६-२७ गळीत हंगामाच्या रोलर पूजन प्रसंगी माजी मंत्री आ. बसवराज पाटील, नगराध्यक्ष बापुरावजी पाटील, संचालक व इतर मान्यवर.

Post a Comment

0 Comments