Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून गोरगरिबांची दिवाळी होणार गोड! परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते दिवाळी किराणा साहित्य किटचे वाटप; तामलवाडीतून उपक्रमाचा शुभारंभ

'Only न्युज धाराशिव'वृत्तसेवा 
तामलवाडी | प्रतिनिधी सचिन शिंदे 
राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे सर्वसामान्य कुटुंबांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा परिस्थितीत दिवाळीसारखा आनंदाचा सण साजरा करणे गोरगरीब व गरजू कुटुंबांसाठी आर्थिकदृष्ट्या कठीण होत आहे. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील गोरगरीब व गरजू कुटुंबांची दिवाळी गोड करण्यासाठी दिवाळी किराणा साहित्य किट वाटपाचा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमाचा शुभारंभ तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथून होणार आहे. सोमवार, दिनांक २ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता तामलवाडी येथील सरस्वती मंगल कार्यालयात परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते गोरगरीब व गरजू नागरिकांना दिवाळी किराणा साहित्य किटचे वाटप करण्यात येणार आहे.

सध्या दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना शेतीतील उत्पन्नाची अनिश्चितता, वाढता खर्च आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत दिवाळीसारखा सण साजरा करताना अनेक कुटुंबांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागते. सणासुदीच्या काळात गरजू कुटुंबांना मदतीचा हात देणे ही सामाजिक बांधिलकी असून, प्रत्येकाच्या घरात दिवाळीचा आनंद पोहोचावा, गोरगरीब कुटुंबांच्याही चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलावे, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाची सुरुवात तामलवाडीतून होत असल्याने तुळजापूर तालुक्यातील गरजू कुटुंबांना या उपक्रमाचा लाभ मिळणार आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक किराणा साहित्याचे किट मिळाल्याने आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या कुटुंबांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, सरस्वती मंगल कार्यालय येथे होणाऱ्या या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तुळजापूर तालुक्याचे शिवसेना नेते ऋषिकेश भैय्या मगर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मोहन पानुरे, तालुकाप्रमुख अमोल जाधव, युवा नेते प्रतीक बाप्पा रोचकरी आणि सुजित हंगरकर बसवराज मसुते अप्पुराजे भोसले सुधीर पाटील सचिन शिंदे नागेश शिंदे निरजन करडे सुधीर गायकवाड शाहीर गायकवाड मुकुंद गायकवाड हे विशेष परिश्रम घेत आहेत. कार्यक्रमाचे नियोजन, लाभार्थ्यांपर्यंत उपक्रमाची माहिती पोहोचविणे तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांच्याकडून तयारी सुरू आहे.

दुष्काळाच्या कठीण परिस्थितीत सणासुदीच्या काळात गरजू कुटुंबांना मदतीचा हात देणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठरणार आहे. तामलवाडी येथून सुरू होणाऱ्या या उपक्रमामुळे परिसरातील गरजू नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

या कार्यक्रमासाठी तामलवाडी व परिसरातील गोरगरीब आणि गरजू नागरिकांनी सोमवार, २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता सरस्वती मंगल कार्यालय येथे उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments