Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

​काटीत ‘डॉ. युसूफ नानाज हॉस्पिटल अँड हॉलिस्टिक हीलिंग सेंटर’चा दि 'ग्रँड इनॉग्रेशन' सोहळा रविवारी संपन्न होणार!



'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
​काटी | उमाजी गायकवाड 
ग्रामीण भागातील नागरिकांना उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा आणि सर्वसमावेशक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, काटी येथे ‘डॉ. युसूफ नानाज हॉस्पिटल अँड हॉलिस्टिक हीलिंग सेंटर’ आणि ‘नानाज मेडिकल’ चे भव्य उद्घाटन सोहळा उद्या, रविवार, दिनांक १ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.  

​या सोहळ्याचे उद्घाटक व प्रमुख अतिथी म्हणून नामवंत वैद्यकीय तज्ज्ञ आणि प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित राहणार आहेत:  
​उद्घाटक / विशेष अतिथी:
​डॉ. एस. एम. दामा सर (एमबीबीएस, एमडी/एमएस)  
​डॉ. सुहास करकमकर सर (एमडी मेडिसीन)  
​डॉ. विशाल गोरे सर (एमडी मेडिसीन)  
​प्रमुख पाहुणे / अध्यक्षीय अतिथी:
​श्री. बापुराव वैजोजीराव देशमुख  
​उत्कृष्ट आरोग्य सेवेचा संकल्प
'बेटर हेल्थ... अ हेल्थिअर टुमॉरो' (उज्वल आरोग्यासाठी उत्तम आरोग्य) या ध्येयाने हे रुग्णालय सुरू करण्यात येत असून, याद्वारे परिसरातील नागरिकांना सर्वसमावेशक (हॉलिस्टिक) आणिcompassionate (संवेदनशील) उपचार पद्धतीचा लाभ मिळणार आहे.
  
​कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अहेरार मतीन काझी, अकबर हुसेन अजिज मुजावर, डॉ. वसेक मतीन काझी, शौकत पठाण (एमआयएम जिल्हाध्यक्ष), गुलाब शेख, रतन पाशा शेख यांच्यासह डॉ. आसिफ युसूफ मुजावर, डॉ. अनिस युसूफ मुजावर, डॉ. अरशद युसूफ मुजावर, डॉ. सिम्रन युसूफ मुजावर, डॉ. समरीन असिफ मुजावर, डॉ. गजल अनिस मुजावर, डॉ. माहेक अरशद मुजावर आणि डॉ. शुभम साळवी आदी डॉक्टर व पदाधिकारी विशेष परिश्रम घेत आहेत.  

​या उद्घाटनाच्या शुभप्रसंगी परिसरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रुग्णालय प्रशासन व आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments