Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

​मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी; तुळजापुरात काँग्रेसतर्फे तहसीलदारांना निवेदन

​तुळजापूर | 'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
भारतीय लोकशाहीचे संरक्षण करणे, मतदारांच्या हक्कांचे रक्षण करणे आणि निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व विश्वासार्ह ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, सध्या देशात निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, निष्पक्षता आणि मतदारांच्या अधिकारांबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या वतीने तुळजापूर येथे आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. 'मत वाचवा, देश वाचवा' अभियानांतर्गत मुख्य निवडणूक आयुक्त श्री. ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदार कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले.  

​तसेच या संदर्भातील मोर्चा व निदर्शने आंदोलनाचे नियोजन असून, लोकशाही मार्गाने आयोजित करण्यात येणाऱ्या या आंदोलनाची नोंद घेऊन प्रशासकीय सहकार्य करावे, अशी विनंतीही निवेदनात करण्यात आली आहे.  
​यावेळी तुळजापूर तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष ॲड. अरविंद बेडगे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. धीरज अप्पासाहेब कदम-पाटील, तालुका कार्याध्यक्ष अमोल माधवराव कुतवळ, नगरसेवक अनंत इंगळे, ओनाद जगताप यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

​

Post a Comment

0 Comments