काटी : तुळजापूर तालुक्यातील काटी येथील हिराबाई औदुंबर वाडकर (वय ९०) यांचे गुरुवारी (दि. २७) रात्री दहाच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी २.३० वाजता त्यांच्या शेतामध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्या येथील प्रगतशील शेतकरी सुरेश वाडकर, सुनिल वाडकर व श्रीकांत वाडकर यांच्या मातोश्री होत्या.
त्यांच्या पश्चात तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
0 Comments