तुळजापूर | 'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
दि पिपल को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. ने अल्पावधीतच ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरत सहाव्या वर्षात यशस्वी पदार्पण केले आहे. या पदार्पणानिमित्त सोसायटीच्या तुळजापूर शाखेचा शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
सोमवार, दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता शिंदे कॉम्प्लेक्स, गाळा नं. १, नळदुर्ग रोड, तुळजापूर येथे या नवीन शाखेचा शुभारंभ होणार आहे. या निमित्ताने सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे.
या शुभारंभ सोहळ्यास खातेदार, शेतकरी बांधव, सामाजिक, व्यापारी, वैद्यकीय, शैक्षणिक, बँकिंग, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांसह मित्र परिवार व आप्तेष्टांनी उपस्थित राहावे, असे आवाहन चेअरमन आमदार अभिजीत धनंजय पाटील (चेअरमन, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना), सुरज सुरेश पाटील (दहिवडीकर) सर्व संचालक मंडळ व कर्मचारी वृंद यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या सोसायटीने अवघ्या पाच वर्षात उल्लेखनीय प्रगती साधली असून, शेतकरी व सामान्य खातेदारांसाठी ती आधारवड ठरली आहे.
0 Comments