Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

विश्वासार्हतेच्या बळावर ‘दि पिपल मल्टीस्टेट’चा आर्थिक उत्कर्षाकडे प्रवास! तुळजापूर शाखेचा ५ वा वर्धापन दिन विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा; सर्वसामान्य, शेतकरी व कष्टकऱ्यांना आधुनिक बँकिंगच्या माध्यमातून भक्कम आधार

वर्धापन दिन सोहळ्यास उपस्थित महंत इच्छागिरी सोमवार गिरी महाराज यांच्यासमवेत चेअरमन सुरज पाटील व इतर पदाधिकारी.

'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
तुळजापूर | उमाजी गायकवाड 
पंढरपूरचे आमदार अभिजीत धनंजय पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सहकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या 'डीव्हीपी दि पिपल मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.' च्या धाराशिव-तुळजापूर शाखेचा पाचवा वर्धापन दिन नुकताच अत्यंत उत्साही आणि मंगलमय वातावरणात पार पडला. अवघ्या पाच वर्षांच्या अल्पावधीत संस्थेने पारदर्शक कारभार आणि ग्राहककेंद्रित सेवांच्या जोरावर सभासद व ठेवीदारांचा दृढ विश्वास संपादन केला आहे.

वर्धापन दिनाचे औचित्य साधून शाखा कार्यालयात श्री सत्यनारायण महापूजेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक विधीचा मान सोसायटीचे ज्येष्ठ व निष्ठावंत खातेदार सागर सूर्यवंशी यांच्या दांपत्याला देण्यात आला. या सोहळ्याला महंत इच्छागिरी सोमवार गिरी महाराज यांची वंदनीय उपस्थिती लाभली. त्यांनी संस्थेच्या उत्रोत्तर प्रगतीसाठी आशीर्वाद देत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

तुळजापूर शाखेच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सत्यनारायण पूजेदरम्यान आरती करताना ज्येष्ठ खातेदार सागर सूर्यवंशी व मान्यवर.

विश्वासार्हता आणि आधुनिक सेवेचा संगम
'दि पिपल मल्टीस्टेट'ने नेहमीच तळागाळातील नागरिक, शेतकरी, लहान व्यापारी आणि कष्टकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून आर्थिक बळ देण्याचे कार्य केले आहे. याप्रसंगी बोलताना उपस्थितांनी सांगितले की, "बँकिंग क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेत संस्थेने आपल्या गतिमान सेवा आणि विश्वासार्हतेच्या बळावर भक्कम स्थान निर्माण केले आहे. आगामी काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना अधिक तत्पर व डिजिटल सेवा पुरवण्याचा संकल्प संस्थेने सोडला आहे."

"ग्राहकांचा विश्वास हीच आमची खरी ताकद: चेअरमन सुरज पाटील"
"गेल्या पाच वर्षांत 'दि पिपल मल्टीस्टेट'ने केवळ बँकिंग व्यवहार केले नाहीत, तर सभासद आणि ग्राहकांशी विश्वासाचे भक्कम नाते निर्माण केले आहे. संस्थापक मार्गदर्शक आमदार अभिजीत पाटील यांच्या दूरदृष्टीमुळे आणि धोरणांमुळेच संस्था आज प्रगतीच्या शिखराकडे वाटचाल करत आहे.शेतकरी, कष्टकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांना आर्थिक स्वावलंबनाकडे नेणे हेच आमचे प्राथमिक ध्येय राहिले आहे. पाचव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आम्ही आमच्या सर्व ग्राहकांना अधिक तत्पर, पारदर्शक आणि डिजिटल बँकिंग सेवा पुरवण्याचा संकल्प करत आहोत. ग्राहकांनी दाखवलेला हाच विश्वास आमच्या भविष्यातील वाटचालीची खरी ऊर्जा आहे."
— सुरज सुरेश पाटील (चेअरमन, डीव्हीपी दि पिपल मल्टीस्टेट)

महंत इच्छागिरी सोमवार गिरी महाराज यांचा सत्कार करताना सोसायटीचे सुरज पाटील व पदाधिकारी.

मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
या वर्धापन दिन सोहळ्यास सोसायटीचे चेअरमन सुरज सुरेश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद भुतेकर, जनरल मॅनेजर शशिकांत जगताप, विभागीय अधिकारी सुरज गरड, तसेच तुळजापूर शाखा व्यवस्थापक सुनील जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

याशिवाय, कार्यक्रमाला शाखेतील असंख्य खातेदार, ठेवीदार, कर्जदार, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सामाजिक-आर्थिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी संस्थेच्या ५ वर्षांच्या यशस्वी वाटचालीबद्दल व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments