Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते देवानंद भाऊ रोचकरी यांच्या वाढदिवसानिमित्त तुळजापुरात उद्या भव्य सत्कार सोहळा; कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन

'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
तुळजापूर | उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्याचे लोकनेते आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मा. श्री. देवानंद भाऊ रोचकरी साहेब यांचा शनिवार, दिनांक २० जून २०२६ रोजी वाढदिवस आहे. या अभिष्टचिंतन सोहळ्याचे औचित्य साधून तालुक्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

शिवसेना आणि देवराज मित्र मंडळाच्या वतीने आयोजित या सत्कार सोहळ्याला तालुक्यातील नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन देवराज मित्र मंडळाचे तुळजापूर तालुकाध्यक्ष ॲड. उदय प्रतापराव भोसले यांनी केले आहे.

जुन्या एस.टी. स्टँडसमोरील मध्यवर्ती कार्यालयात होणार सोहळा
देवानंद भाऊ रोचकरी यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी सकाळी ठीक ११:०० वाजता तुळजापूर येथील जुन्या एस.टी. स्टँडसमोरील शिवसेना आणि देवराज मित्र मंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयात या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने संपूर्ण तालुक्यातून कार्यकर्ते आणि हितचिंतक भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी एकत्र येणार आहेत.

कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन
"तुळजापूर तालुक्याच्या विकासात आणि पक्षसंघटनेत मोलाचे योगदान देणारे आपले सर्वांचे मार्गदर्शक देवानंद भाऊ रोचकरी साहेब यांच्या वाढदिवसाचा सत्कार सोहळा उत्साहात साजरा होत आहे. तरी देवराज मित्र मंडळ आणि शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी शनिवारी सकाळी ११ वाजता मध्यवर्ती कार्यालयासमोर मोठ्या संख्येने उपस्थित राहून भाऊंना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा द्याव्यात."
— ॲड. उदय प्रतापराव भोसले (तालुकाध्यक्ष, देवराज मित्र मंडळ, तुळजापूर तालुका)

Post a Comment

0 Comments