Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

माजी विद्यार्थ्यांकडून पांगरदरवाडी शाळेला 5100 रुपयांची मदत;क्रीडा शिक्षक शिवाजी निंबाळकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

​काटी/उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे माजी विद्यार्थी तथा सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक शिवाजी दादाराव निंबाळकर यांनी नुकतीच शाळेला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी शाळेच्या प्रगतीचे कौतुक करत 5100 रुपयांची स्वेच्छा निधी शाळेला सुपूर्द केली.
श्री. निंबाळकर हे सध्या उमरगा येथील एका शिक्षण संस्थेचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. आपल्या मूळ असलेल्या पांगरदरवाडी गावी आणि शाळेत आल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सहेतूक मार्गदर्शन केले. शाळेचा उंचावलेला शैक्षणिक दर्जा आणि प्रगतीचा आलेख पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.

​यावेळी सहशिक्षिका भावना चौधरी यांनी कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की, "ग्रामीण भागातील साक्षरता आणि संस्कृती टिकवण्यासाठी श्री. निंबाळकर यांच्यासारख्या सुशिक्षित व संवेदनशील माजी विद्यार्थ्यांची समाजाला गरज आहे. अशा हाडाच्या शिक्षकांचा सकारात्मक दृष्टिकोन गावाला सुधारण्यासाठी दीपस्तंभ ठरू शकतो."

​या कार्यक्रमाप्रसंगी मुख्याध्यापक व्यंकट कोळी यांच्यासह शाळेतील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments