'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
एकलव्य विद्या संकुल, मंगरूळ-यमगरवाडी (ता. तुळजापूर) येथील माध्यमिक शाळेचा विद्यार्थी देव कांबळे याने तुळजापूर तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले. त्याच्या या यशामुळे त्याची धाराशिव जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
अणदूर येथील श्री श्री रविशंकर प्रशालेत तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत देव कांबळे याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक मिळविला. त्याच्या या यशामुळे एकलव्य विद्या संकुलाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
देवच्या यशामागे बुद्धिबळ प्रशिक्षक अशोक बनकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष उद्धव काळे, उपाध्यक्ष डॉ. अभय शहापूरकर, कार्यवाह विवेक अयाचित, कोषाध्यक्ष नरेश पोटे, मुख्याध्यापक अण्णासाहेब कोल्हटकर, विठ्ठल म्हेत्रे तसेच संस्थेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी देव कांबळेचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
0 Comments