शिक्षणाचा वसा आणि निष्ठेचा गौरव! कुर्डूवाडी येथील भव्य सोहळ्यात श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (स्वेरी), पंढरपूर आणि स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ तंत्रज्ञान, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने काटी येथील शिक्षक दांपत्य श्री. बाळासाहेब किसनराव साळुंके आणि सौ. अनिता अर्जुनराव मोहिते-साळुंके यांना मान्यवरांच्या हस्ते ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्तेचा ध्यास घेत ज्ञानदानाचे अखंड व्रत जपणाऱ्या तुळजापूर तालुक्यातील काटी येथील रहिवासी व शेळगाव ज्युनिअर कॉलेज (आर.), शेळगाव येथील शिक्षक दांपत्य श्री. बाळासाहेब किसनराव साळुंके आणि सौ. अनिता अर्जुनराव मोहिते-साळुंके यांना ‘ज्ञानयात्री आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (स्वेरी), पंढरपूर आणि स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ तंत्रज्ञान, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक १३ सप्टेंबर रोजी कुर्डूवाडी (ता. माढा, जि. सोलापूर) येथील तुळजाई लॉन्स येथे या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
समर्पित सेवेची आणि शैक्षणिक गुणवत्तेची दखल
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, नावीन्यपूर्ण अध्यापन पद्धतीचा प्रभावी वापर आणि शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी साळुंके दांपत्याने दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन हा सन्मान करण्यात आला. स्वेरीचे संस्थापक व प्राच्यविद्या तज्ज्ञ प्रा. डॉ. बब्रुवाहन पांडुरंग रोंगे यांच्या पुढाकाराने आयोजित या ज्ञानयात्री गौरव सोहळ्यात साळुंके दांपत्याला सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
समारंभास सहकाऱ्यांची आणि ग्रामस्थांची मोठी उपस्थिती
या सोहळ्यात साळुंके दांपत्यासोबतच विविध शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यावेळी साळुंके दांपत्याच्या या यशाबद्दल आनंद व्यक्त करण्यासाठी बाळासाहेब मोहिते, मुख्याध्यापक जि परिषद प्रशाला (जवळा) तसेच शेळगाव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे सहशिक्षक श्री. प्रवीण गाढवे, श्री. चंद्रकांत ताकमोगे, श्री. बळीराम गुरव आणि श्री. धनाजी तिकटे यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, स्नेही व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेळगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. बाबासाहेब गायकवाड, संस्थेचे सचिव लक्ष्मणराव गायकवाड तसेच सर्व संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले.
सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव
अध्यापनातील सातत्य, उत्कृष्ट अध्यापन शैली,
विद्यार्थ्यांमधील संस्कारनिर्मिती आणि निस्वार्थ सेवेच्या जोरावर मिळवलेल्या या पुरस्कारामुळे काटी व शेळगाव परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. साळुंके दांपत्याच्या या गौरवाबद्दल शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
0 Comments