Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजापुरात आंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेचा उत्साह; ४ जिल्ह्यांतील ११० खेळाडूंचा सहभाग

तुळजापूर | 'Only  न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत आयोजित आंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन झाले. या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव या चार जिल्ह्यांतील तब्बल ११० खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलनाने स्पर्धेचा अधिकृत प्रारंभ झाला. याप्रसंगी बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हासदादा बोरगावकर यांनी अध्यक्षस्थान भूषवले, तर माजी सिनेट सदस्य प्रा. संभाजी भोसले यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीरंग लोखंडे, विद्यापीठाचे क्रीडा संचालक सचिन देशमुख, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे उपाध्यक्ष चंद्रजीत जाधव, धाराशिव झोनचे क्रीडा सचिव प्रदीप इंगळे, अभ्यास मंडळ सल्लागार भालचंद्र सानप, राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ. गोविंद काळे, उपप्राचार्य डॉ. प्रवीण भाले आणि क्रीडा प्रमुख प्रा. अशोक कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

राष्ट्रीय खेळाडूंचा विशेष गौरव
उद्घाटन सोहळ्यात विद्यापीठाचे राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्कृती वानखेडे, तनिषा बोशमणीकर, सानिया तडवी, राधिका तिवारी आणि दीक्षा सोनवणे या गुणवंत खेळाडूंचा विशेष सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले.

रंगतदार सामन्यांना सुरुवात
उद्घाटनानंतर उद्घाटक प्रा. संभाजी भोसले व महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे उपाध्यक्ष चंद्रजीत जाधव यांनी खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. श्रीरंग लोखंडे यांनी अध्यक्षीय समारोप केला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. एन. एस. कदम, प्रा. आमोद जोशी, प्रा. गौतम जाधव आणि प्रा. धर्मराज पवार यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अशोक मरडे यांनी केले, तर उपप्राचार्य डॉ. प्रवीण भाले यांनी प्रास्ताविक मांडले व प्रा. अशोक कांबळे यांनी आभार मानले. या औपचारिक सोहळ्यानंतर सायंकाळपर्यंत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या सभागृहात बुद्धिबळाचे अत्यंत रंगतदार आणि चुरशीचे सामने सुरू होते.

Post a Comment

0 Comments