काटी | 'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
महाराष्ट्र शासनाच्या तहसील कार्यालय, तुळजापूर यांच्या वतीने सावरगाव महसूल मंडळातील सर्व मराठा-कुणबी बांधवांसाठी विशेष नोंदणी व प्रमाणपत्र वितरणाचे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. कुणबी नोंदींचा शोध घेणे आणि प्रमाणपत्रासाठी अर्ज सुलभरीत्या सादर करता यावेत, या उद्देशाने हे विशेष शिबीर भरवले जात आहे.
हे शिबीर शुक्रवार, ११ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता सावरगाव येथे पार पडणार आहे.
आवश्यक कागदपत्रे:
शिबिरात उपस्थित राहणाऱ्या नागरिकांनी व लाभार्थ्यांनी खालील कागदपत्रे सोबत आणणे अनिवार्य आहे:
जुने महसुली पुरावे, फेरफार किंवा खासरा पत्रक
जन्म-मृत्यूच्या जुन्या नोंदी किंवा शाळा सोडल्याचा दाखला (LC)
ओळखपत्र व इतर आवश्यक वैयक्तिक कागदपत्रे
सावरगाव मंडळातील सर्व गरजू लाभार्थ्यांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन तहसील कार्यालय, तुळजापूर तसेच सावरगाव महसूल मंडळातील सर्व तलाठी, मंडळ अधिकारी व महसूल कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments