Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी सप्ताहात श्रीकृष्णलीला कथेने भाविक मंत्रमुग्ध; श्री संजय कुलकर्णी यांच्या निरुपणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
​काटी | उमाजी गायकवाड 
काटी येथील ग्रामस्थांच्या वतीने येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी सप्ताहाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या श्रीमद्भागवत दशम व एकादश स्कंदातील श्रीकृष्णलीला कथेने परिसरातील धार्मिक वातावरण भक्तिमय झाले होते. कथाकार श्री. संजय पांडुरंग कुलकर्णी (काटीकर) यांच्या ओघवत्या आणि अभ्यासपूर्ण निरुपणातून साकारणाऱ्या कृष्णलीला कथेचा भाविक-भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.

​भगवान श्रीकृष्णाच्या जन्मापासून ते त्याच्या बाललीला, कंसवध आणि अलौकिक तत्त्वज्ञानाचे वर्णन श्री. संजय कुलकर्णी यांनी अत्यंत रसाळ आणि भारदस्त भाषेत भाविकांसमोर मांडले. कथेदरम्यान श्रीकृष्णजन्माचा प्रसंग, बालकृष्णाच्या खोड्या, कालियामर्दन आणि गोवर्धन पूजेसारख्या विविध प्रसंगांचे वर्णन ऐकताना उपस्थित भाविक भावविभोर झाले. कथेच्या माध्यमातून अध्यात्म आणि जीवनमूल्यांची सुरेख सांगड घालण्यात आली.

काल्याचे कीर्तन:
सप्ताहाची सांगता आणि उत्सवाची पखरण म्हणून आज, शनिवार दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता ह.भ.प. सुनील महाराज ढगे (काटीकर) यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची भक्तीमय वातावरणात सांगता झाली. 

​काटी व परिसरातील सर्व भाविक-भक्तांनी या काल्याच्या कीर्तनाला व महाप्रसादाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रवणाचा लाभ घेतला.

Post a Comment

0 Comments