Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

ढोकीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट! ३ दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा ग्रामस्थांचा इशारा

'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
ढोकी (धाराशिव): गावातील बेकायदेशीर दारूविक्री, मटका, जुगार, गांजा आणि अवैध सावकारकी यांसारखे समाजघातकी धंदे तात्काळ बंद करावेत, या मागणीसाठी ढोकी येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. याप्रकरणी शुक्रवारी (दि. ४ सप्टेंबर) ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यावर धडक देऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे कारवाईची जोरदार मागणी केली.

ढोकी गावात अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्याचा ठराव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत एकमताने संमत करण्यात आला होता. तरीही गावात बेकायदेशीर दारू, मटका व जुगाराचे अड्डे राजरोसपणे सुरूच असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

तरुण पिढी उध्वस्त, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न!
निवेदनात नमूद केल्यानुसार, गावात डुप्लिकेट विदेशी दारू, पावडरची शिंदी, मकडी जुगार, चरस व गांजाचा सुळसुळाट झाला आहे. या अवैध धंद्यांमुळे तरुण पिढी, मजूर वर्ग व सामान्य नागरिक भरडले जात असून दररोजच्या भांडण-तंट्यांमुळे गावातील शांतता धोक्यात आली आहे. रस्त्याने ये-जा करणाऱ्या महिला व मुलींना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याने प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा
येत्या ३ दिवसांत या बेकायदेशीर धंद्यांवर आणि त्यांच्या प्रमुख सूत्रधारांवर कठोर कायदेशीर कारवाई न झाल्यास, ग्रामपंचायत ढोकी व सर्व ग्रामस्थांच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, गृहमंत्री, जिल्हाधिकारी धाराशिव, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक (राज्य उत्पादन शुल्क) आणि अन्न व औषध प्रशासन निरीक्षकांकडे पाठवण्यात आल्या आहेत.

निवेदन देतेवेळी उपसरपंच अमोल समुद्रे, जिल्हा मजूर फेडरेशनचे माजी चेअरमन गफार काझी, पंचायत समितीचे माजी सदस्य संग्राम देशमुख, भाजप तालुकाध्यक्ष प्रमोद देशमुख, आरेफ काझी, दौलत गाढवे, अर्शद काझी, राजपाल देशमुख, दगडू धावारे, पोलीस पाटील राहुल वाकुरे, सलीम काझी, ॲड. तुकाराम शिंदे, भाजप शहराध्यक्ष गुणवंत सुतार, पंकज देशपांडे, अरुण डोलारे, अरुण देशमुख, अजित देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments