Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

धाराशिव जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट! तुळजापूर तालुक्यासह जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; काँग्रेसची आक्रमक मागणी

दुष्काळाची झळ आणि शेतकऱ्यांचा आक्रोश!धाराशिव जिल्ह्यात पावसाच्या ओढ्यामुळे पिकांचे झालेले अतोनात नुकसान आणि निर्माण झालेली गंभीर परिस्थिती पाहता, तुळजापूर तालुक्यासह संपूर्ण जिल्हा तात्काळ 'कोरडा दुष्काळ' घोषित करावा, या मागणीसाठी तहसीलदार मा. श्री. अरविंद बोळंगे यांच्याकडे निवेदन सुपूर्द करताना काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड. धिरज पाटील, तालुकाध्यक्ष ॲड. अरविंद बेडगे, कार्याध्यक्ष अमोल कुतवळ व इतर पदाधिकारी-कार्यकर्ते.

'Only न्यूज धाराशिव' वृत्तसेवा 
 तुळजापूर | उमाजी गायकवाड 
गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी भीषण संकटात सापडला आहे. सोयाबीन, उडीद, बाजरी, मका यांसारखी पिके, तसेच द्राक्षबागा पावसाअभावी करपून गेल्या असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन औपचारिक पंचनामे व कापणी प्रयोगांचा फार्स न करता तुळजापूर तालुक्यासह संपूर्ण धाराशिव जिल्हा तात्काळ 'कोरडा दुष्काळ' म्हणून घोषित करावा, अशी आक्रमक मागणी धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे.   

यासंदर्भात जिल्हाधिकारी मा. श्री. किर्तीकुमार पुजार यांच्या नावे तुळजापूरचे तहसीलदार मा. श्री. अरविंद बोळंगे यांच्याकडे एक विस्तृत निवेदन सादर करण्यात आले आहे. तुळजापूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. अरविंद बेडगे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष ॲड. धिरज पाटील, कार्याध्यक्ष अमोल कुतवळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शेकडो कार्यकर्त्यांच्या वतीने प्रशासनाला हे निवेदन देण्यात आले.   

निवेदनातील प्रमुख आणि महत्त्वाच्या मागण्या:
१. तात्काळ दुष्काळ घोषणा: जुन्या निकषांची किंवा औपचारिक प्रक्रियेची वाट न पाहता संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात सरसकट कोरडा दुष्काळ घोषित करावा.
२. हेक्टरी १ लाख रुपये मदत: पीक नुकसानीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला असून त्याला तात्काळ प्रतिहेक्टरी १ लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी.
३. कर्जमाफी व नवीन पीककर्ज: सर्वसमावेशक कर्जमाफी योजना लागू करावी, चालू पीककर्जाचे व्याज माफ करावे आणि शेतकऱ्यांना तात्काळ नवीन पीककर्ज उपलब्ध करून द्यावे.
४. प्रोत्साहनपर अनुदानात वाढ: नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिले जाणारे ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान वाढवून थेट १ लाख रुपये करण्यात यावे.
५. पीक विमा भरपाई: पीक विमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित विम्याची भरपाई मिळावी.
६. छावण्या व पिण्याचे पाणी: जनावरांसाठी तात्काळ चारा छावण्या सुरू कराव्यात आणि ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची सोय करावी.
७. रोजगार हमी योजना: हाताला काम मिळण्यासाठी ग्रामीण भागात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे तात्काळ सुरू करावीत.
८. विहीर व बोर अधिग्रहण: बोरी धरणात केवळ ७% मृत साठा शिल्लक असल्याने तुळजापूर, नळदुर्ग शहरासह ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे आवश्यक तिथे विहिरी व बोरचे अधिग्रहण करावे.
९. विद्यार्थी व बचत गटांना दिलासा: विद्यार्थ्यांची शालेय फी व शिष्यवृत्ती माफ करावी, तसेच एस. टी. बस पास मोफत द्यावेत. याशिवाय महिला शेतकरी बचत गटांची कर्जवसुली थांबवून व्याज माफ करावे.   

आंदोलनाचा इशारा
प्रशासनाने व शासनाने या मागण्यांची तात्काळ गंभीर दखल न घेतल्यास संपूर्ण जिल्ह्यात तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.   

या प्रसंगी प्रशांत नानासाहेब पाटील, बाळकृष्ण कचरे,खलील सय्यद, राजाभाऊ शेरखाने, सुरेश जगताप, धवलसिंह लावंड, शिवलिंग मचाले,संदीप कदम, अण्णासाहेब राठोड,शाहू माने, हरिश जाधव, नागनाथ भांजी, सीताराम पाटील, माणिक पवार, चंद्रकांत सोनवणे, विकास पाटील, सिताराम पाटील,संभेराव शिंदे, मलिकार्जुन इळगुरे, बोधला गायकवाड, विकास गायकवाड,गजानन चाफे, बाळासाहेब कचरे यांसह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments