Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

Only न्युज धाराशिव | विशेष बातमी; लोकनेते देवानंद भाऊ रोचकरी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा; तुळजापूरात शिवसैनिकांचा जनसागरदेवराज मित्र मंडळ व शिवसेनेच्या वतीने भव्य सत्कार सोहळा, तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव

'Only  न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
तुळजापूर | उमाजी गायकवाड 
शिवसेनेचे जेष्ठ नेते, तुळजापूर तालुक्याचे लोकनेते, भावी आमदार म्हणून ओळख असलेले व देवराज मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री. देवानंद भाऊ रोचकरी साहेब यांचा वाढदिवस आज तुळजापूर येथे मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला.

या प्रसंगी देवराज मित्र मंडळ व शिवसेना पक्षाच्या वतीने भाऊसाहेबांचा शाल, श्रीफळ व आई तुळजाभवानीची प्रतिमा देऊन भव्य सत्कार करण्यात आला. कार्यकर्त्यांच्या घोषणांनी व फटाक्यांच्या आतषबाजीने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.

व्यासपीठावर मान्यवरांची उपस्थिती
यावेळी देवराज मित्र मंडळाचे तालुकाध्यक्ष ॲड. उदय भोसले, आण्णासाहेब भोसले, लखन भोसले, राहुल भोसले, दत्तात्रय बिराजदार, मुकेश डावकरे, ईश्वर बिराजदार, गोटू बिराजदार, ह.भ.प. श्री. लिंगय्या स्वामी महाराज, बालाजी ढोले, गोरख शिंदे, अनिल लवटे, समीर पटेल, अरूण साखरे, शिवानंद भुजबळे, राम मंडलिक, आप्पाराव गाडेकर, सोपान धनवडे, सर्जेराव लोमटे पाटील, हणमंत जाधव, महावीर मामा मुळे, भैरवनाथ माडजे, बापू नन्नवरे, रामदास पवार, लक्ष्मण नवगीरे, शिवाजी काळदाते, प्रकाश काळदाते, नाना नावडे, नवनाथ इंडे, विद्यासागर लोखंडे, तात्या नन्नवरे, प्रतिक जाधव, राहुल हंगरगेकर, रामदास दादा गोरे, अंबादास जाधव, देविदास ताकमोघे, नितेश तानवडे आदी मान्यवर उपस्थित होते.

शिवसेना पदाधिकाऱ्यांची लक्षणीय उपस्थिती
शिवसेना तालुका प्रमुख अमोल जाधव, शहर प्रमुख बापूसाहेब भोसले, मोहन भोसले, किरण यादव, नितीन मस्के, युवासेना प्रमुख महेश केदार, युवासेना जिल्हा प्रमुख गणेशजी जगताप यांच्यासह तुळजापूर तालुक्यातील शिवसेना व देवराज मित्र मंडळाचे शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

"देवानंद भाऊ आमचे दैवत" - कार्यकर्त्यांच्या भावना
"देवा भाऊंनी अडचणीत असलेल्या प्रत्येकाला मदतीचा हात दिला. विकासकामांचा धडाका लावला. त्यामुळे ते फक्त नेते नसून आमचे दैवत आहेत," अशा भावना यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या नागरिकांनी देवानंद भाऊसाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद दिले.

Post a Comment

0 Comments