तुळजापूर | 'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकेच्या गळ्यातील सुमारे 4 तोळे वजनाचे सोन्याचे गंठण गर्दीचा फायदा घेऊन लंपास करणाऱ्या सराईत चोरट्याला तुळजापूर पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातून अटक केली आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नेमकं काय घडलं?
शनिवार दि.२० रोजी रोजी बाहेरुन आलेली एक महिला भाविक कुटुंबासह दर्शन रांगेत उभी होती. गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने महिलेच्या गळ्यातील 4 तोळ्याचे सोन्याचे गंठण लंपास केले. दर्शन झाल्यानंतर हा प्रकार लक्षात येताच महिलेने तुळजापूर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
पोलिसांची जलद कारवाई
गुन्हा दाखल होताच तुळजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे हवालदार शिवाजी शिरसट, कामतकर, व पथकाने तपासाची चक्रे फिरवली. मंदिर परिसर व बाहेरील शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारांच्या माहितीवरून आरोपी सोलापूर जिल्ह्यात असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांच्या पथकाने सोलापुरात सापळा रचून एका आरोपीला 24 तासांच्या आत जेरबंद केले. त्याच्याकडून चोरीस गेलेले 4 तोळे वजनाचे, अंदाजे 1 लाख 20 हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण हस्तगत करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षकांनी केले कौतुक
या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी तुळजापूर पोलीस पथकाचे अभिनंदन केले आहे. "मंदिर परिसरात भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिस सदैव तत्पर आहेत. गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत सतर्क राहावे, मौल्यवान सोन्याचे दागिने घालून येणे टाळावे"
असे आवाहन पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी केले आहे.
पुढील तपास सुरू
आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. तुळजापूर पोलीस पुढील तपास करत आहेत.
Only न्युज धाराशिव - गुन्हेगारांवर वचक!
0 Comments