Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

चव्हाणवाडी शाळेतील 117 विद्यार्थ्यांनी अनुभवली योगसाधना; 'निरोगी वृद्धत्वासाठी योग' संकल्पनेवर भरजिल्हा परिषद शाळेत विविध आसन-प्राणायामाचा सराव; मुख्याध्यापकांसह सर्व शिक्षकांचा पुढाकार



'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
काटी | उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील चव्हाणवाडी,  "शरीर माध्यम खलु धर्मसाधनम्" या उक्तीप्रमाणे ठणठणीत शरीराशिवाय कोणतेही सत्कार्य साध्य होत नाही, हा संदेश देत जि.प.प्रा.शाळा चव्हाणवाडी येथे 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

भारत सरकार व आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तसेच शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांच्या परिपत्रकानुसार, रविवार दि. 21 जून 2026 रोजी सकाळी 6:30 ते 8:00 या वेळेत शाळेच्या प्रांगणात योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षीची मध्यवर्ती संकल्पना *'निरोगी वृद्धत्वासाठी योग' (Yoga for Healthy Aging)* होती.

दीड तास चालली योगसाधना
शाळेतील इयत्ता 1ली ते 8वीच्या 117 विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना व प्रास्ताविक हालचालींनी झाली. त्यानंतर उभ्या आसनांमध्ये ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन; बैठ्या आसनांमध्ये दंडासन, भद्रासन, वज्रासन, उष्ट्रासन, शशांकासन, वक्रासन यांचा सराव करण्यात आला.

पोटावरील आसनांमध्ये मकरासन, भुजंगासन, शलभासन तर पाठीवरील आसनांमध्ये सेतुबंधासन, अर्धहलासन, शवासन ही आसने घेण्यात आली. शेवटी कपालभाती, नाडीशोधन, भ्रामरी प्राणायाम व ध्यानधारणेद्वारे योगसाधनेची सांगता करण्यात आली.

शिक्षकांचा पुढाकार
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी मुख्याध्यापक श्री. नितीन गायकवाड यांनी योगशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. त्यांना सहशिक्षक श्री. हणमंत डोलारे, श्री. विकास ढंगे, श्री. शांताराम कुंभार, सौ. सुवर्णा काळे व सौ. दिपाली व्होटे यांनी मोलाचे सहकार्य केले.

"योगाचे मानवी जीवनातील महत्त्व ओळखून विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच निरोगी जीवनशैली रुजवणे गरजेचे आहे," असे मत यावेळी शिक्षकांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments