Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजापुरातील पुजारी नगरात अखंड हरिनाम सप्ताहाचा भक्तिमय सोहळा; २६ ऑगस्टपासून श्रीमद्भागवत कथा

तुळजापूर | 'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
शहरातील पुजारी नगर येथे श्री अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद्भागवत महापुराण कथा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, २६ ऑगस्ट ते सोमवार, ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत हा धार्मिक सोहळा होणार असून, परिसरातील भाविकांना विविध धार्मिक कार्यक्रमांची पर्वणी मिळणार आहे.

विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती प्रतिष्ठापना वर्धापन दिनानिमित्त आयोजित या सोहळ्यात गुरुवर्य ह.भ.प. श्री नवनाथ महाराज चिखलीकर यांच्या वाणीतून दररोज दुपारी २ ते ४ या वेळेत श्रीमद्भागवत कथेचे निरूपण होणार आहे. त्यामुळे पुजारी नगर परिसरात सप्ताहाच्या निमित्ताने भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.

सप्ताहादरम्यान पहाटे ५ ते ६ काकड आरती, सकाळी ९ ते १० ज्ञानेश्वरी पारायण, ११ ते १२ गाथा भजन, दुपारी २ ते ४ श्रीमद्भागवत कथा, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ आणि रात्री ८ ते १० कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

नामवंत कीर्तनकारांची सेवा
सप्ताहात ह.भ.प. गुरुवर्य श्री नवनाथ महाराज चिखलीकर, ह.भ.प. श्री लक्ष्मण महाराज पांढरे (सिंदफळ), ह.भ.प. श्री बळभीम परदेशी महाराज, ह.भ.प. श्री वाळुकुंम महाराज परदेशी, ह.भ.प. श्री बापू माळी महाराज (सिंदफळ) तसेच ह.भ.प. श्री प्रभाकर नाईकवाडी महाराज यांची कीर्तनसेवा लाभणार आहे.
तसेच मंगळवार, १ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. श्री नवनाथ महाराज चिखलीकर यांचे काल्याचे कीर्तन होणार असून, त्यानंतर श्री गणेश विश्वनाथ पुजारी यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक, वारकरी व भाविकांकडून तयारी करण्यात येत आहे. तुळजापूर व परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद्भागवत कथा व ज्ञानेश्वरी पारायणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
व्यासपीठ : ह.भ.प. सौ. मनीषा मोहन शिंदे

आयोजक / पत्ता :
ह.भ.प. डॉ. मोहन प्रल्हाद महाराज शिंदे,
मौजे पुजारी नगर, नळदुर्ग रोड, शालंबवाई निवास, शिंदे परिवार, तुळजापूर, जि. धाराशिव.
संपर्क : ९८२२३६८७५६३

                      --'Only न्यूज धाराशिव' वृत्तसेवा

Post a Comment

0 Comments