Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी येथे 'श्री ज्ञानप्रबोधिनी वारकरी शिक्षण संस्था' इमारतीचा भव्य भूमिपूजन सोहळा उद्या; वारकरी संप्रदायातील दिग्गजांची उपस्थिती


'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
काटी | उमाजी गायकवाड 
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदायाचे अधिष्ठान, मृदंग-गायन विद्या आणि अध्यात्माचे सुयोग्य धडे देण्याच्या उद्देशाने काटी येथे 'श्री ज्ञानप्रबोधिनी वारकरी शिक्षण संस्था' उभारली जात आहे. या संस्थेच्या नवीन इमारतीचा भव्य भूमिपूजन समारंभ उद्या, बुधवार दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत अत्यंत उत्साहात व धार्मिक वातावरणात पार पडणार आहे.

जवळगाव रोड, काटी येथील प्रस्तावित जागेवर हा सोहळा संपन्न होणार असून, या निमित्ताने राज्यभरातील वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ संत, महाराज व कीर्तनकारांची उपस्थिती लाभणार आहे.

श्रीगुरु मारोती बाबा कुरेकर यांचे लाभणार शुभ आशीर्वाद
या भूमिपूजन सोहळ्याला श्रीगुरु मारोती बाबा कुरेकर यांची प्रमुख उपस्थिती व शुभ आशीर्वाद लाभणार आहेत. त्यासोबतच वारकरी जगतातील नामांकित गुरुवर्य आणि मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.

सोहळ्यास उपस्थित राहणारे प्रमुख गुरुवर्य व संत मंडळी:
श्रीगुरु मारोती बाबा कुरेकर,
श्रीगुरु कान्होबा महाराज देहूकर,श्रीगुरु संदिपान दादा हसेगावकर,श्रीगुरु जयवंत महाराज बोधले, श्रीगुरु राम (भाऊ) काजळे, श्रीगुरु ज्ञानेश्वर माऊली दिंडेगावकर, श्रीगुरु तुकाराम भाऊ (दत्त आश्रम),श्रीगुरु अनिल महाराज पाटील,श्रीगुरु प्रभाकर दादा बोधले,श्रीगुरु उमेश महाराज दशरथे,श्रीगुरु संदीपान बाबा शिंदे,श्रीगुरु निलेश महाराज झेरेगावकर

पारंपरिक वारकरी शिक्षण परंपरेस मिळणार नवे बळ
काटी व परिसरातील भाविक, तरुण आणि विद्यार्थ्यांना धार्मिक, सांस्कृतिक तसेच संगीत शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. या शिक्षण संस्थेमुळे परिसरात अध्यात्मिक वातावरण दृढ होण्यास मदत होईल, असा विश्वास निमंत्रकांनी व्यक्त केला आहे.

आयोजक व निमंत्रक:
या सोहळ्याचे आयोजन श्री. मृदंगसम्राट कृष्णा महाराज कदम, श्री. मनोहर महाराज कदम, श्री. राम कदम आणि श्री. हरी कदम यांच्या वतीने करण्यात आले असून, काटी व परिसरातील सर्व भक्तांनी, नागरिकांनी व वारकरी बंधूंनी या भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कार्यक्रम संक्षिप्त तपशील:
कार्यक्रम: श्री ज्ञानप्रबोधिनी वारकरी शिक्षण संस्था - भव्य भूमिपूजन समारंभ

दिनांक: २६ ऑगस्ट २०२६ (वार: बुधवार)

वेळ: सकाळी १०:०० ते दुपारी १२:००

स्थळ: जवळगाव रोड, काटी (जि. धाराशिव)

Post a Comment

0 Comments