धाराशिव:-धाराशिव तालुक्यातील बेंबळी जिल्हा परिषद गटात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने प्रचाराने मोठी गती घेतली आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा परिषदेचे अधिकृत उमेदवार विनायक (भाऊ) विठ्ठल शेळके यांच्यासह पंचायत समितीच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली असून, ग्रामीण भागातील मतदारांकडून त्यांना वाढता पाठिंबा मिळत आहे.
विजयाचा संकल्प आणि जोरदार शुभारंभ
बेंबळी येथील ग्रामदैवत श्री गणेश मंदिरात शिवसेना पक्षाच्या वतीने प्रचाराचा दणदणीत शुभारंभ करण्यात आला. यावेळी गणरायाला श्रीफळ अर्पण करून विजयाचे साकडे घालण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे उमेदवार विनायक (भाऊ) शेळके यांच्यासह बेंबळी पंचायत समिती गणात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सौ.सरस्वती मोहन वाघुलकर व रुईभर पंचायत समिती गणात सौ. शिलाबाई नारायण कोळगे हे उमेदवार मशाल चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात असून कार्यकर्त्यांमध्ये विजयाचा मोठा आत्मविश्वास दिसून येत आहे.
विकासकामांचा अजेंडा आणि जनतेचा विश्वास
प्रचारादरम्यान बोलताना विनायक शेळके म्हणाले की, "खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्या प्रामाणिक नेतृत्वावर जनतेचा गाढ विश्वास आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतरस्ते, आरोग्य आणि पाणीपुरवठा व गटाचा विकास हा आमचा मुख्य अजेंडा असून त्याला ग्रामस्थांकडून मोठी पसंती मिळत आहे."
‘आमचं ठरलंय!’ - मतदारांचा निर्धार
शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गटातील प्रत्येक गावात घरोघरी जाऊन प्रचारपत्रकांचे वाटप केले आहे. थेट संवाद आणि जनसंपर्कामुळे प्रचाराचा झंझावात वाढला असून, अनेक गावांमध्ये ‘आमचं ठरलंय,मत शिवसेनेलाच’ असा सूर उमटत आहे. ग्रामस्थांचा वाढता प्रतिसाद पाहता, बेंबळी गटात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे.
या प्रचार दौऱ्यात शिवसेना पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी होत आहेत.
0 Comments