Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

गिरी सरांचा विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मोलाचा वाटा.... शरण पाटील. प्रा. संजय गिरी यांचा सेवापुर्तीबद्ल नगर शिक्षण विकास मंडळाकडून विशेष सत्कार...

मुरुम/प्रतिनिधी
शैक्षणिक क्षेत्रात निष्ठेने कार्य करून प्रदीर्घ सेवेनंतर ते आज सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचा हा प्रवास प्रेरणादायी राहिला.केवळ कुटुंबच नव्हे तर महाविद्यालयात देखील त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले. विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून गिरी सरांचा विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मोलाचा वाटा राहिल्याचे प्रतिपादन युवा नेते शरण पाटील यांनी केले.

मुरूम येथील प्रतिभा निकेतन कनिष्ठ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या कनिष्ठ महाविद्यालयातील जीवशास्त्र विषयाचे प्रा. संजय गिरी यांचा शनिवारी (ता. ३१) रोजी नगर शिक्षण विकास मंडळाकडून सेवापुर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य उल्हास घुरघुरे होते. प्रा. संजय गिरी व सौ. विजया गिरी सपत्नीक, वडील प्रेमगीर गिरी, आई अनुसया गिरी यांचा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत यथोचित सत्कार करण्यात आला. 

यावेळी नगर शिक्षण विकास मंडळाचे संचालक प्रा. डॉ. सतिश शेळके, माजी प्राचार्य सच्चिदानंद अंबर, काशिनाथ मिरगाळे, रामलिंग बिराजदार, राजू मुल्ला आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी कै. माधवराव पाटील यांच्या प्रतिमेस शरण पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. कै. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करून महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रा. अशोक बावगे, ज्ञानेश्वरी सुरवसे, भाग्यश्री उडचणे आदींनी मनोगत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना गिरी म्हणाले की, शैक्षणिक क्षेत्रात काम करताना आलेले अनुभव कथन करून संपूर्ण जीवनाचा लेखाजोखा मांडून सर्वांप्रती कृतज्ञताभाव व्यक्त करून उपस्थितांचे आभार मानले. अध्यक्षीय समारोप प्रसंगी उल्हास घुरघुरे म्हणाले की, गिरी सरांनी आई-वडिलांच्या संस्काराची शिदोरी घेऊन शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ सेवा करत असताना विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा ध्यास त्यांनी घेतला. प्रा. उमाकांत महामुनी यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. सतिश रामपुरे तर आभार प्रा. साक्षी महामुनी यांनी मानले. प्राध्यापक, मुख्याध्यापक, सहशिक्षक, मित्र परिवार, नातेवाईक आदींनी त्यांचा यथोचित सत्कार केला.                                         

मुरूम, ता. उमरगा येथील संस्थेच्या  वतीने संजय गिरी, विजया गिरी यांचा सत्कार करताना शरण पाटील, सतिश शेळके, उल्हास घुरघुरे व अन्य.

Post a Comment

0 Comments