धाराशिव | 'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी अधिकृतपणे शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर (वाय. बी. सेंटर) येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ‘ऑपरेशन टायगर’ पूर्ण झाल्याची घोषणा करत या खासदारांचे स्वागत केले.
पक्षप्रवेश केलेले सहा खासदार: १. ओमराजे निंबाळकर २. संजय दिना पाटील३. संजय जाधव ४. भाऊसाहेब वाकचौरे५. संजय देशमुख ६. नागेश पाटील आष्टीकर
या ऐतिहासिक पक्षप्रवेशानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार प्रहार केला. "आमचे 'ऑपरेशन टायगर' पूर्णपणे कायदेशीर, संसदीय आणि घटनात्मक चौकटीत बसवून फुलप्रूफ यशस्वी केले आहे," अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.पत्रकार परिषदेत त्यांनी पुढे बोलताना सांगितले की,चार वर्षांपूर्वीच्या उठावाचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंनी यावेळी ६ खासदारांच्या पक्षप्रवेशाला थेट षटकार मारल्याची उपमा दिली.
'लाडके संजय': पत्रपरिषदेत बोलताना शिंदेंनी आपल्याकडे आता तीन-तीन 'संजय' संजय दिना पाटील, संजय जाधव, संजय राठोड असल्याचे सांगत संजय राऊतांना टोला लगावला.
उमेदवारी जाहीर: आगामी निवडणुकांमध्ये या सहाही खासदारांना पुन्हा शिवसेनेचेच तिकीट दिले जाईल, अशी मोठी घोषणाही त्यांनी केली.
या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदे यांनी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे विशेष कौतुक करत त्यांच्याबाबत अत्यंत महत्त्वाची विधाने केली.
ओमराजे रील्स स्टार नाही, तर 'रिअल स्टार' – मुख्यमंत्री
पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिव जिल्ह्यातील राजकीय घडामोडींवर विशेष भाष्य केले. ते म्हणाले, "धाराशिव जिल्ह्यातील जमिनीवर काम करणारे लोकप्रतिनिधी म्हणून खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहणार आहे. विरोधकांनी ओमराजेंना नेहमी 'रील्स स्टार' म्हणून हिणवले, परंतु ते खरे 'रिअल स्टार' आहेत, हे त्यांनी आपल्या कामाने दाखवून दिले आहे."
पुढे बोलताना मुख्यमंत्री भावूक झाले, त्यांनी ओमराजे निंबाळकर यांचे वडील कै. पवनराजे निंबाळकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. "कै. पवनराजे निंबाळकर यांच्या खटल्याचा निकाल अत्यंत दुर्दैवी लागला आहे. या कठीण काळात आणि यापुढेही मी ओमराजे निंबाळकर यांच्या पाठीशी एक कुटुंब म्हणून खंबीरपणे उभा राहीन," अशी भावनिक आणि राजकीय ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
खासदार का फुटले याचे आत्मचिंतन करा!
ठाकरे गटाला उपरोधिक टोला लगावताना मुख्यमंत्री म्हणाले, "आमच्यावर टीका करण्यापेक्षा आपले खासदार आपल्याला सोडून का चालले आहेत, याचे आधी आत्मचिंतन करा. पक्षात हुकूमशाही आणि घुसमट होत असल्यामुळेच खासदारांनी हा निर्णय घेतला आहे. शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. मी स्वतः आजही एक कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय आणि इथे येणाऱ्या प्रत्येकाला सन्मानाचीच वागणूक मिळेल."
सहाही जणांना पुन्हा उमेदवारी; विकासनिधीची ग्वाही
पक्षप्रवेश केलेल्या ६ खासदारांच्या भविष्याबाबत मोठी घोषणा करताना मुख्यमंत्री म्हणाले की, "यापुढेही हेच सहा जण खासदारकीसाठी पक्षाचे उमेदवार असतील आणि ते निश्चितपणे निवडून येतील. खासदारांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी कधीही आणि कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी मी ग्वाही देतो. सर्वांनी मिळून आता फक्त कार्यकर्ता म्हणून जनतेच्या सेवेसाठी काम करायचे आहे."
या पुढील होणाऱ्या निवडणुकीसाठी 'ऑपरेशन टायगर' यशस्वी करून महाराष्ट्रात दोन नंबरचा पक्ष ठरवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना चारीमुंड्या चीत केले आहे. या राजकीय भूकंपामुळे विशेषतः धाराशिवसह संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात आता मुख्यमंत्र्यांचे पारडे जड झाले आहे.
0 Comments