ढोकी/सुरेश कदम
धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील दैनिक पुण्यनगरी चे पत्रकार सुरेश कदम यांचा चिरंजीव सार्थक कदम यांच्या वाढदिवसानिमित्त माघी वारी जया एकादशी बाल वारकरी यांच्या सुंदर मधुर वाणी भजनाच्या समावेत मोठ्या उत्साहात गुरुवार दि. 28 रोजी साजरा करत कदम परिवाराने गेल्या 17 वर्षापासून ची परंपरा कायम राखली आहे प्रारंभी राजमाता मासाहेब जिजाऊ, श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन करून भजन कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.
ढोकी येथील दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार सुरेश कदम व ढोकी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आशा सुपरवायजर रेखाताई गुंजकर-कदम यांचा चिरंजीव सार्थक याचा वाढदिवसानिमित्त श्री ज्ञानोबाराय संगीत आत्यात्मिक गुरुकुल कसबे तडवळे येथील बाल वारकरी यांनी "आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझिया संपला हरीच्या दासा" सुंदर अभंग गायन केले तसेच चौसाळा ता कळंब व ढोकी येथील भजनी मंडळाने माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवारl केला अंगीकार तुका म्हणेl संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज येथे म्हणतात की गुरु महाराजांनी माझ्यावर कृपा केली परंतु त्यांनी स्वप्नामध्ये देखील मला* *आज सोनियाचा दिवस* या अभंगावर उत्कृष्ट भजन टाळ मृदंग वाजवत गायन केले वारकरी संप्रदाय मध्ये वाढदिवस साजरा करण्यात आला.
समाजात लोक वाढदिवसावर लाखो रुपयांचा खर्च करून चुराडा केला जातो मात्र कदम परिवार ने आपल्या चिरंजीवचा वाढदिवस वारकरी संप्रदाय मध्ये गेल्या 17 वर्षापासून करण्याची परंपरा पुढे कायम ठेवली कदम परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे नंतर सर्व भजनी मंडळाला उपासाचा अल्पोहार देण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष गोदावरी केंद्रे, ढोकी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अशा सुपरवायजर रेखाताई गुंजकर.कदम, पुण्यनगरीचे पत्रकार सुरेश कदम, सानिका कदम,नंदनी लोमटे, ह भ प राहुल महाराज करंजकर, ह भ प लखन महाराज करंजकर,ह भ प नारायण शिंदे, पखवाज वादक ह भ प राजेंद्र महाराज काळे, चोपदार ह भ प शंकर महाराज केंचे, गायनाचार्य बालाजी पवार, पखवाज वादक बाबासाहेब आघोर, शहाजी ईटेकर, पखवाज वादक नाना पाटील, गायनाचार्य बापू टोणगे उद्धव मोरे सौ मंगल पवार, विमल मोरे काशीबाई टोणगे संगीता रोडे,, पोलीस पाटील राहुल वाकुरे, संजय जाधव, गोपाळ माळी, बापूसाहेब बोडके, यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments