काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून महाराजांच्या विचारांना उजाळा देण्यात आला.
रविवार दि.1 रोजी सकाळी संत रोहिदास नगरात (चांभार गल्ली) संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मयुर गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी 'संत रोहिदास महाराज की जय' अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. संत शिरोमणी महाराज जयंती समारोपानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी विक्रमसिंह देशमुख, सुजित हंगरगेकर, सयाजीराव देशमुख आदी मान्यवरासह माणिक गायकवाड,अनिल गायकवाड,मयुर गायकवाड, दत्तू गायकवाड, सुभाष गायकवाड, ज्ञानदेव गायकवाड, सुनील गायकवाड,आकाश गायकवाड,बबलू गायकवाड, सुरज गायकवाड, आशिष गायकवाड,बापू गायकवाड, धनंजय गायकवाड,संतोष गायकवाड,अमोल गायकवाड, बालाजी गायकवाड आदी चर्मकार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संत रोहिदास महाराजांनी दिलेला समतेचा आणि श्रमाचा संदेश आजच्या पिढीला मार्गदर्शक असून
"संत रोहिदास महाराजांचे विचार हे केवळ एका समाजापुरते मर्यादित नसून ते संपूर्ण मानवतेसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या समतेच्या शिकवणुकीमुळे समाजात एकोपा वाढण्यास मदत होते."
-सुनिल गायकवाड,काटी
0 Comments