धाराशिव:-येडशी जिल्हा परिषद गटाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनसेवेची तळमळ असलेल्या नेतृत्वाला संधी देण्याचे आवाहन महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार देवदत्त मोरे यांनी केले आहे. प्रचारादरम्यान मतदारांशी संवाद साधताना त्यांनी 'विकासाचा हा रथ' अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी मशाल चिन्हासमोरील बटण दाबून भरघोस मतांनी निवडून देण्याची विनंती केली.
यावेळी मतदारांशी संवाद साधताना येडशी पंचायत समितीच्या उमेदवार नीता गजानन नलावडे आणि कसबे तडवळे पंचायत समिती गणातील उमेदवार बालाजी मनके सहभागी होते. या उमेदवारांनी गटातील विविध गावांचा दौरा करून ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या.
पदे नसतानाही विकासाचा डोंगर:
देवदत्त मोरे यांनी आपल्या आजवरच्या सामाजिक कार्याचा लेखाजोखा मतदारांसमोर मांडला. यामध्ये प्रामुख्याने कसबे तडवळे येथे 9 कि.मी. लांबीची जलयुक्त शिवाराची कामे,विविध गावांत मंदिर जिर्णोद्धार,येडशी प्रसिद्ध असलेले रामलिंग मंदीराचे शिखर बांधकाम व सोनेरी कळस, महादेव मंदिर सभामंडप आणि शिखर बांधकामे,जिल्हा परिषद शाळांना संगणक संच आणि मोबाईल टॅबचे वाटप,
गरिबांसाठी मोफत किराणा वाटप आणि एक हजार मोफत स्वच्छता गृहांचे वाटप,तरुणांसाठी व्यायामशाळा, जलतरण तलाव आणि वृद्धाश्रमाची उभारणी हि कामे
सत्तेत किंवा कोणत्याही पदावर नसतानाही मोरे यांनी स्वबळावर आणि सामाजिक भावनेतून ही कामे मार्गी लावली आहेत. याच विकासकामांच्या जोरावर त्यांनी आता मतदारांचा कौल मागितला आहे.
देवदत्त मोरे यांचे विशेष वक्तव्य
"राजकारण हे माझ्यासाठी केवळ सत्तेचे साधन नसून ती समाजसेवेची एक संधी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पद नसतानाही मी जनसेवेचे व्रत जोपासले आहे. मग ते जलयुक्त शिवाराचे काम असो वा शाळांमधील आधुनिक शैक्षणिक सुविधा. येडशी गटाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि सामान्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी मला व माझ्या सहकाऱ्यांना आपला आशीर्वाद द्यावा. सामाजिक विकास, शिक्षण आणि पायाभूत सुविधा हाच आमचा अजेंडा असून विकासाची ही मशाल घराघरात पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे."
— देवदत्त मोरे (उमेदवार, येडशी जिल्हा परिषद गट)
0 Comments