मुरुम/प्रतिनिधी
उमरगा तालुक्यातील मुरुम येथील स्व. गंगादेवी माधवराव पाटील यांची बुधवारी ( ता. ४ ) रोजी पाचवे पुण्यस्मरण श्री माधवराव पाटील महाविद्यालय व माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी येथे साजरे करण्यात आले.
स्व. मातोश्री गंगादेवी माधवराव पाटील यांच्या प्रतिमेस उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. सुधीर पंचगल्ले, डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी, डॉ. रवींद्र आळंगे, डॉ. सुभाष हुलपल्ले, डॉ. अविनाश मुळे, डॉ. महेश मोटे, डॉ. शिवपुत्र कनाडे, डॉ. रवींद्र गायकवाड, डॉ. किरण राजपूत, डॉ. सुजित मठकरी, डॉ. जयश्री सोमवंशी, डॉ. संध्या डांगे, डॉ. शीला स्वामी आदींची उपस्थिती होती. प्रा. पायल आगरकर, प्रा. वैष्णवी पाटील, प्रा. विनंती बसवंतबागडे, प्रा. प्रियंका काजळे, राजू ढगे, दत्तू गडवे आदींनी पुढाकार घेतला. प्रतिभा निकेतन विद्यालयात मुख्याध्यापक उल्हास घुरघुरे, परिवेक्षक विवेकानंद परसाळगे, प्रा. उमाकांत महामुनी, प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलमध्ये मुख्याध्यापिका अनुराधा जोशी, सच्चिदानंद अंबर, जगदीश सुरवसे, भुसणीचे मुख्याध्यापक प्रेमनाथ आपचे तर नूतन विद्यालयात मुख्याध्यापक राजशेखर कोरे, बळीराम गंगणे, युवराज खताळ, कविता कदम आदींच्या हस्ते मातोश्री गंगादेवी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, प्रतिभा निकेतन कनिष्ठ महाविद्यालय, प्रतिभा निकेतन विद्यालय, मुरुम, कोथळी, भुसणी व नूतन प्राथमिक शाळा, प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूल, मुरुम आदी विद्यालयातही अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.
मातोश्री गंगादेवी माधवराव पाटील यांनी प्रतिकूल काळात स्वर्गीय माधवराव (काका) पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यामुळे त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव माजी राज्यमंत्री बसवराज पाटील हे राज्याचे सक्षम नेतृत्व करत सामाजिक-राजकीय क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटविला आहे. तर
दुसरे चिरंजीव धाराशिव जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील हे सहकार क्षेत्रातून जिल्ह्याचे नेतृत्व करीत आहेत. कृषी व शिक्षण क्षेत्रात देखील त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचे नातू शरण पाटील राज्यभर युवकांची बांधणी करून युवकांचे संघटन वाढवीत आहेत. उमरगा जनता बँकेच्या माध्यमातून तरुणांना अधिक व्यवसायभिमुख बनवून सहकार क्षेत्र अधिक मजबूत करण्यावर त्यांचा भर आहे. या सर्वांना सुसंस्कारित विचार देण्यामध्ये मातोश्री गंगादेवी माधवराव पाटील यांचा मोलाचा वाटा राहिला, असल्याचे उल्हास घुरघुरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विविध शाखेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.
फोटो ओळ : मुरुम, ता. उमरगा येथील माधवराव पाटील महाविद्यालयात मातोश्री गंगादेवी पाटील यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना चंद्रकांत बिराजदार, सुधीर पंचगल्ले, शिवपुत्र कनाडे, आप्पासाहेब सूर्यवंशी, रवींद्र आळंगे, सुभाष हुलपल्ले, अविनाश मुळे व अन्य.
0 Comments