Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

माळुंब्रा येथील जिल्हा परिषद प्रशालेतील जुने सवंगडी तब्बल 22 वर्षांनंतर आले एकत्र; शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा

काटी/उमाजी  गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथील जिल्हा परिषद प्रशालेतील सन 2002-03 मधील इयत्ता दहावीतील माजी विद्यार्थी तब्बल 22 वर्षांनंतर एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला.

व्हॉट्स ॲप, फेसबूक आणि इन्स्टाग्राम या माध्यमाचा  चांगला उपयोग करीत इयत्ता दहावीतील जुने सवंगडी एकत्र आले. याची प्रचिती रविवार दि. 30 रोजी तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथील सन 2002-2003 मधील  जिल्हा परिषद प्रशालेत शिकणाऱ्या माजी विद्यार्थी व शिक्षकांना आली. त्यावेळी दहावीत असलेल्या विद्यार्थ्यांनी आठवणींना उजाळा देण्यासाठी स्नेहमेळावा ठरवला. सोशल मीडियाचा वापर करून सवंगड्यांना सांगावा पाठवला. त्यास प्रतिसाद देत सर्वांनी शाळेत धाव घेतली अन् तब्बल 22 वर्षांनंतर रंगली बालपणाच्या भावविश्वातील जुन्या मित्रांची मैफिल.

माळुंब्रा येथील जिल्हा परिषद प्रशालेतून 2002-03 मध्ये दहावी सुटलेले विद्यार्थी आता महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, सोलापूर ,धाराशिव आदी विविध ठिकाणी स्थायिक झाले. सोशल मीडियातून पुन्हा वर्गमित्र, मैत्रिणींचा संपर्क झाला. व्हॉट्स ॲप ग्रुपवर सर्व एकत्र आले. गप्पा रंगू लागल्या. आठवणी ताज्या झाल्या. मग पुन्हा भेटून धमाल करण्याची इच्छा अनेकांनी व्यक्त केली. आणखी सवंगड्यांचे क्रमांक मिळवले. त्यांनाही ग्रूपमध्ये ॲड केले. सर्वानुमते दिवस ठरला. स्थानिक विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाची तयारी केली. त्यावेळचे अनेक शिक्षक निवृत्त झालेले. बरेचशे गावाबाहेर होते. त्यांचा पत्ता शोधला, संपर्क केला, आमंत्रण दिले. ठरल्याप्रमाणे  रविवारी सर्वजण एकत्र आले.

शाळेतच  सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत छोटेखानी कार्यक्रम आयोजित  करुन गेम, गाणी, भेंड्या यासारखे खेळ खेळून धमाल उडवून दिली. नंतर सर्वांनी मिळून स्नेहभोजन करीत एकमेकांविषयी  चौकशी करीत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
सर्व माजी शिक्षकांचा विद्यार्थ्यांनी सन्मान केला. अनेकांनी आठवणी सांगितल्या. शिक्षकांनीही आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांच्या आनंदात सहभाग घेतला. नंतर सर्व माजी विद्यार्थी आपल्या पूर्वीच्या बेंचवर वर्गात बसले. पुन्हा तोच धिंगाणा घालत आठवणींना वाट मोकळी करून दिली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवा  निवृत्त शिक्षक लाटे सर  होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीराम वडणे यांनी केले तर आभार डॉ. कविता ठोंबरे यांनी मानले. 

यावेळी लक्ष्मीकांत कोळगे, श्रीराम वडणे,रामदास वडणे , धनाजी देवकर,पल्लवी भिंगरे, महेश  वडणे, भाऊ वडणे, गीतांजली वडणे,छाया मगर आदींसह जवळपास 50 माजी विद्यार्थी एकत्र आले होते. 
मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी सर्व  माजी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments