Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी घेतले श्री तुळजाभवानी देवीचे भावपूर्ण दर्शन; विधिवत पूजा व कुलाचार संपन्न

तुळजापूर | Only न्युज धाराशिव वृत्तसेवा 
महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी आज महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी नतमस्तक होत भावपूर्ण दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवीची विधिवत पूजा-अर्चा करून आरती केली.

श्री क्षेत्र तुळजापूर येथे आगमन झाल्यानंतर राज्यपालांनी देवीची ओटी भरून परंपरेनुसार कुलधर्म आणि कुलाचार पूर्ण केले.

मंदिर संस्थानाकडून जंगी स्वागत
राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान येथे आगमन होताच जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार तसेच अपर जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी उपेंद्र तामोरे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे यथोचित स्वागत केले.

प्रशासकीय अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती
या प्रसंगी राज्यपालांच्या समवेत प्रशासनातील विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते, ज्यामध्ये
डॉ. प्रशांत नारनवरे (राज्यपालांचे सचिव),पवन सिंग (खाजगी सचिव),रितू खोकर (पोलीस अधीक्षक),
प्रियंवदा म्हाडदळकर (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद),सचिन पांडकर (अपर पोलीस अधीक्षक),माया माने (तहसीलदार तथा व्यवस्थापक-प्रशासन) यांच्यासह श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments