Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजापूर तालुक्यात जि.प. उपाध्यक्षा उषाताई गायकवाडांची धडाकेबाज शाळा भेट; विद्यार्थ्यांच्या ‘बालमंत्रिमंडळाची’ आणि उपक्रमांची अनुभवली कमाल!​आरळी व बिजनवाडी शाळांमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद; खिचडीचा आस्वाद घेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे अन् शिस्तीचे मुक्तकंठाने कौतुक.

 'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा ​
तुळजापूर | उमाजी गायकवाड 
जिल्हा परिषदेच्या कारभारात गतिशीलता आणत आणि थेट ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेचा ग्राउंड झिरोवरून आढावा घेण्यासाठी धाराशिव जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ. उषाताई रविंद्र गायकवाड व जि.प. सदस्या सीमाताई भैरवनाथ माडजे यांनी मंगरूळ व बिजनवाडी गटातील शाळांना अचानक आणि सदिच्छा भेट दिली. यावेळी आरळी येथील शैक्षणिक कामकाजाची पाहणी करण्यासह, बिजनवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुलांनी चालवलेले ‘बालमंत्रिमंडळ’, ‘विद्यार्थी बचत बँक’ आणि राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रम पाहून उपाध्यक्षा भारावून गेल्या. त्यांनी विद्यार्थ्यांसोबत शालेय पोषण आहारातील खिचडीचा आस्वाद घेत मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
​बिजनवाडी शाळेतील ‘बालमंत्रिमंडळ’ व उपक्रमांची भुरळ
​आज दिनांक ५ ऑगस्ट रोजी उपाध्यक्षा उषाताई गायकवाड व सदस्या सीमाताई माडजे यांनी बिजनवाडी शाळेस अचानक भेट दिली. यावेळी शाळेतील शिस्त, रम्य वातावरण आणि विद्यार्थ्यांनी राबवलेले अनोखे उपक्रम पाहून पाहुणेही अवाक झाले. शाळेत विद्यार्थी बचत बँक कार्यरत असून यामध्ये तब्बल ७०,००० रुपयांची घसघशीत रक्कम जमा असल्याचे विद्यार्थी व्यवस्थापक व वित्तमंत्री कु. सृष्टी सोमनाथ लोहार व श्लोक अशोक लांडगे यांनी आत्मविश्वासाने सांगितले.
​तसेच, शाळेच्या परसबागेत विविध प्रकारच्या फुलांची आणि पालेभाज्यांची सेंद्रिय लागवड केली जाते, ज्याचा नियमित वापर शालेय पोषण आहारात होतो, अशी माहिती बागकाम मंत्री श्रेयस श्रीधर माने याने दिली. याशिवाय शाळेत सुरू असलेला गांडूळ खत निर्मिती प्रकल्प संरक्षण मंत्र्यांनी, तर पोषण आहार वाटप आणि जेवणाची शिस्तबद्ध बैठक व्यवस्था याविषयीची माहिती सार्थक माने यांनी दिली. मुख्याध्यापक श्री. नवनाथ जत्ती आणि सर्व शिक्षकवृंदाच्या मार्गदर्शनाखाली फुललेल्या या बालगोपाळांच्या मंत्रिमंडळाचे आणि मुख्यमंत्र्यांच्या (गजानन काळदाते) उत्कृष्ट नेतृत्वाचे उपाध्यक्षांनी भरभरून कौतुक केले.

​शाळेतील बालमंत्रिमंडळाची उल्लेखनीय वैशिष्ट्ये:
​विद्यार्थी बचत बँक: सुमारे ७०,००० रुपयांची बचत जमा असणारा उपक्रम.
​सेंद्रिय परसबाग व गांडूळ खत: शालेय पोषण आहारासाठी ताजी भाजीपाला पुरवठा करणारी बाग व खत प्रकल्प.
​उत्कृष्ट शिस्त व व्यवस्थापन: शालेय मंत्रिमंडळाद्वारे सर्व जबाबदाऱ्यांचे उत्तम नियोजन.
विद्यार्थ्यांसमवेत खिचडीचा आस्वाद व जिव्हाळ्याचे संवाद
​भेटीदरम्यान उपाध्यक्षा उषाताई गायकवाड आणि जि.प. सदस्या सीमाताई माडजे यांनी विद्यार्थ्यांसोबत बसून शालेय पोषण आहारातील खिचडीचा आस्वाद घेतला. "खिचडीची चव अतिशय उत्तम व रुचकर आहे," अशी दाद देत त्यांनी विद्यार्थ्यांशी आपुलकीने संवाद साधला. मुलांच्या शिक्षणाबाबत आस्थेने विचारपूस करत त्यांना मनापासून प्रोत्साहन दिले.

​यापूर्वी आरळी येथील जि.प. प्रशासलेस भेट देऊन त्यांनी शैक्षणिक कामकाजाची, स्वच्छतेची, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची आणि उपलब्ध सुविधांची सखोल पाहणी केली होती. आरळी शाळेत उपस्थित मान्यवरांनी व ग्रामस्थांनी शाळेच्या विकासासाठी काही मागण्या उपाध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिल्या, त्यावर त्यांनी सकारात्मक विचार करून सर्व आवश्यक भौतिक गरजा, बांधकाम व दुरुस्तीची कामे वेळेवर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

​मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीने बळ
​या दोन्ही शाळांच्या सदिच्छा भेटीप्रसंगी प्रसिद्ध उद्योजक श्री. भैरवनाथ जयकुमार माडजे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. अशोक लांडगे, उपाध्यक्ष श्री. सतिश नावडे (शिवसेना शाखाप्रमुख), उपशाखाप्रमुख सुनील नावडे, श्री. पांडुरंग माने, श्री. किशोर शिंदे, मुख्याध्यापक नवनाथ जत्ती, शिक्षकवृंद बापूराव मोरे, विकास पारधे, संतोष माडजे, दिलीप चौधरी, विद्या पुजारी, रामचंद्र शिंदे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​विद्यार्थ्यांचे सर्वांगीण शिक्षण, उत्तम पोषण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा संकल्प अधिक दृढ करत, शाळांच्या विकासासाठी व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण सर्वतोपरी कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी उपाध्यक्षा उषाताई गायकवाड यांनी दिली.

Post a Comment

0 Comments