Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा: 'एकलव्य विद्या संकुला'च्या मुलींचा शानदार दबदबा; १४ वर्षांखालील संघ जिल्हास्तरावर!


'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
काटी | उमाजी गायकवाड 
नुकत्याच पार पडलेल्या तुळजापूर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटन पटलावर तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ-यमगरवाडी येथील 'एकलव्य विद्या संकुला'च्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत वर्चस्व सिद्ध केले. विविध वयोगटांतील चुरशीच्या सामन्यांमध्ये विजय मिळवत या शाळेच्या खेळाडूंनी उपस्थितांची दाद मिळवली.

या स्पर्धेत एकलव्य विद्या संकुलाच्या चार संघांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये १४ वर्षांखालील मुलींच्या संघाने तुळजापूर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय स्पर्धेतील आपले स्थान निश्चित केले. या यशस्वी संघात प्रीती सरवदे, पार्वती मारकड, सिद्धी मारकड आणि स्नेहल यमगर या खेळाडूंचा समावेश आहे.

याशिवाय, १७ वर्षांखालील मुलींच्या संघाने तसेच १४ वर्षांखालील दुसऱ्या संघाने उपविजेतेपद (द्वितीय क्रमांक) मिळवले. मुलांच्या १४ वर्षांखालील गटातही एकलव्याच्या संघाने उपविजेतेपदावर नाव कोरले.

स्पर्धेत चंचल पवार, समृद्धी कोल्हटकर, वैष्णवी गायकवाड, प्रतीक्षा गायकवाड, नंदिनी मारकड, रूपाली गिरी, अस्मिता भोजने, सलोनी राठोड, जानवी राजपूत, आकाश मुळे, ऋतिक इरेवाड, प्रणय कुंभार, नैतिक गावडे, शंभूराजे अंतरेड्डी, तेजस हळदे, गणेश शिंदे, अजय गट्टे, यश दिसागज आणि तेजस गजभार या खेळाडूंनीही उत्कृष्ट खेळ केला.

खेळाडूंच्या या यशाबद्दल आणि त्यांना मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक अनिल घुगे व यशवंत निंबाळकर यांचे संस्थेचे अध्यक्ष उद्धवराव काळे, उपाध्यक्ष डॉ. अभय शहापूरकर, कार्यवाह विवेक अयाचित, मुख्याध्यापक अण्णासाहेब कोल्हटकर, विठ्ठल म्हेत्रे आणि सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष कौतुक व अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments