Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

मनोज जरांगे-पाटील पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर: ८ ऑगस्टला तुळजापूर तालुक्यातील सावरगावमध्ये संवाद सभा; मराठा समाजात प्रचंड उत्साह

'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
काटी | उमाजी गायकवाड 
मराठा आरक्षणाच्या लढ्यातील अग्रगण्य नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या बहुप्रतीक्षित पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याचा शुभारंभ होत असून, शनिवार, दिनांक ८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ठीक ८:०० वाजता ते तुळजापूर तालुक्यातील ऐतिहासिक सावरगाव येथे भेट देणार आहेत. या दौऱ्यामुळे सावरगावसह संपूर्ण पंचक्रोशीतील वातावरण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा पेटून उठले असून ग्रामस्थांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.

छत्रपतींच्या चरणी नतमस्तक होऊन संवादाचा नारळ फुटणार
आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे-पाटील यांचे सावरगाव येथे आगमन होताच छत्रपती शिवाजी महाराज चौकातील भव्य शिवस्मारकास पुष्पहार अर्पण करून ते अभिवादन करतील. त्यानंतर छत्रपतींच्या साक्षीनं उपस्थित हजारो शिवप्रेमी, मराठा बांधव आणि स्थानिक नागरिकांशी ते थेट संवाद साधणार आहेत. या सदिच्छा भेटीदरम्यान आरक्षणाच्या आगामी दिशा, कायदेशीर लढा आणि समाजाची एकजूट यावर ते रोखठोक भाष्य करण्याची शक्यता आहे.

भव्य स्वागत आणि जय्यत तयारी: जरांगे-पाटील यांच्या स्वागतासाठी सावरगावात ठिकठिकाणी भगवे ध्वज, फलक आणि कमानी उभारण्यात आल्या असून संपूर्ण गाव भगवेमय झाले आहे.

पंचक्रोशीतून हजारो बांधव धडकणार: काटी, सावरगाव आणि लगतच्या १० ते १२ गावांतील युवक, महिला व ज्येष्ठ नागरिक या ऐतिहासिक सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

शांततापूर्ण आंदोलनाचा संदेश: हा दौरा पूर्णपणे शांततामय मार्गाने आणि सनदशीरशीर पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधण्यात आला आहे.

आरक्षणाच्या पुढील रणनीतीकडे लक्ष: मुंबई आणि मराठवाड्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील या दौऱ्याला विशेष राजकीय व सामाजिक महत्त्व प्राप्त झाले असून, सावरगावच्या भूमीतून जरांगे-पाटील काय नवा संदेश देतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

"मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही. सावरगाव येथील सदिच्छा भेटीच्या निमित्ताने समाजातील अभूतपूर्व एकजूट पाहायला मिळेल. त्यामुळे परिसरातील सर्व शिवप्रेमी व नागरिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे."
— आयोजक व सकल मराठा समाज, सावरगाव (पंचक्रोशी)

Post a Comment

0 Comments