Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

खासदारकीचे तिकीट, आमदारकी अन् आता जिल्हा परिषदेचे तिकीटही घरातच; भाजप कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्याच उचलायच्या का? ​घराणेशाहीवरून खासदार ओमराजे निंबाळकर यांचा आमदार राणाजगजितसिंह पाटलांवर 'तिखट' प्रहार; येडशीतील सभेत प्रचाराचा धडाका.​

धाराशिव:"ज्यांनी ४० वर्षे पक्षाचा झेंडा खांद्यावर वाहिला, त्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून केवळ अध्यक्षपदाच्या हव्यासापोटी पुन्हा घराणेशाही लादली जात आहे. खासदारकी लढवलेली व्यक्ती आता जिल्हा परिषदेच्या जागा अडवून बसली असेल, तर भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्याच उचलायच्या का?" अशा जळजळीत शब्दांत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर तोफ डागली. यावेळी भाजपचे 40 वर्षांपासून निष्ठेने काम करणाऱ्या रामदास कोळगेवर अन्याय करुन पत्नीला उमेदवार लादली असा आरोपही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

​येडशी जिल्हा परिषद गटातील शिवसेना (उबाठा) व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार देवदत्त मोरे, पंचायत समिती उमेदवार नीता नलावडे व बालाजी मनके यांच्या प्रचारार्थ सोमवारी येडशी येथे आयोजित भव्य जाहीर सभेत ते बोलत होते.
​'आमच्याकडे कार्यकर्ता मोठा होतो, त्यांच्याकडे फक्त पाटील'
​विरोधकांवर निशाणा साधताना ओमराजे म्हणाले की, "नेत्यांची मुलं मोठी करण्यापेक्षा सामान्य कार्यकर्त्याला बळ देणं हेच आमचं ध्येय आहे. आमच्याकडे शेतकरी कुटुंबातील 'कैलास पाटील' यांच्यासारखा सामान्य कार्यकर्ता मोठा होतो, पण त्यांच्याकडे फक्त 'पाटील'च मोठे होतात! जर कैलास पाटील आमदार आणि मी खासदार होऊ शकतो, तर सामान्य कार्यकर्ता जिल्हा परिषद सदस्य का होऊ शकत नाही?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

​विकासाचा लेखाजोखा आणि 'वॉशिंग मशीन'वर टोला
​यावेळी ओमराजे यांनी गेल्या काही वर्षांत केलेल्या कामांचा पाढाच वाचला. मेडिकल कॉलेजचा प्रश्न, सोलापूर-तुळजापूर रेल्वे, पीक विम्याचा लढा आणि कोरोना काळातील मदतीचा उल्लेख करत त्यांनी जनतेची दाद मिळवली. "आम्ही भ्रष्टाचार केला नाही, म्हणूनच आम्हाला भाजपच्या 'वॉशिंग मशीन'मध्ये जाण्याची गरज पडली नाही. आम्ही ताठ कण्याने तुमच्यासमोर मते मागायला आलो आहोत," असा टोलाही त्यांनी लगावला.
​येडशीचा स्वाभिमान जागा ठेवा!
​"एका बाजूला सत्तेचा माज आणि घराणेशाही आहे, तर दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य कार्यकर्त्याची निष्ठा आहे. आमच्याकडे धनशक्ती नसली तरी जनशक्ती आणि स्वाभिमान आहे. येडशीची जनता घराणेशाही गाडून सर्वसामान्यांची 'मशाल' विजयी करेल," असे भावनिक आवाहन ओमराजे निंबाळकर यांनी केले. या सभेदरम्यान अनेक युवकांनी शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश केला.

​या सभेला येडशी परिसरातील अबालवृद्धांसह महिला व तरुणांची विक्रमी उपस्थिती होती. देवदत्त मोरे यांच्या विजयाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.

Post a Comment

0 Comments