मुरूम/प्रतिनिधी
उमरगा तालुक्यातील मुरुम येथील प्रतिभा निकेतन विद्यालयातील १० वी, १२ वी,नीट,सीईटी,स्कॉलरशिप परीक्षेत,अटल मॅरेथॉन स्पर्धेत घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा नगर शिक्षण विकास मंडळ अध्यक्ष तथा डिसीसी बँकेचे चेअरमन बापूराव पाटील यांच्या शुभहस्ते सत्कार सोहळा पार पडला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष- सौ.महानंदा रोडगे तर प्रमुख अतिथी म्हणून माजी पंचायत समिती सभापती मदन पाटील,गोविंद पाटील,माजी नगराध्यक्ष रशीद शेख, दत्ता चटगे, माजी उपनगराध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे, दिलीप पांचाळ, माजी सरपंच महानंद कलशेट्टी आदींची उपस्थिती होती.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता सरवस्ती, शिक्षण महर्षी चैतन्यमूर्ती माधवराव पाटील काका यांच्या प्रतिमेचे पूजन संपन्न झाले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा येतोचिथ सत्कार करून पुढील शैक्षणिक प्रवासासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्रा.करबसप्पा ब्याळे,मदन पाटील आदींनी मनोगतपर बोलताना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केला. उच्च माध्यमिक विद्यालयाच्या माध्यमातून नीट,जेईई शिक्षण लवकर चालू करण्यात येणार असल्याचे याप्रसंगी बोलताना सांगितले. बालाजी बीदे, विवेकानंद परसाळगे, प्रा.अण्णाराव कांबळे, प्रा.कल्याणी टोपगे, प्रा. दयानंद राठोड, राधाकृष्ण कोंढारे, सौ.कस्तुरी जाधव, सौ. शाहीन तांबोळी, सौ.मनीषा कंटेकुरे, प्रा.शोभा पटवारी, कार्यलीयन अधीक्षक शिवानंद पाटील, बसवराज पाटील,रविकांत स्वामी,ज्ञानेश्वर माळी आदींनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन- इरफान मुजावर, प्रास्ताविक- संतोषकुमार सूर्यवंशी,आभार- उल्हास घुरघुरे यांनी मानले, यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments