काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी सारख्या ग्रामीण भागातील जुनैद नुसरत नासेर काझी या तरुणाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या गेलेल्या परीक्षेत देदीप्यमान कामगिरी केली असून, दुहेरी यश संपादन केले.
जुनैद काझी यांनी 2024 मध्ये दिलेल्या एमपीएससी परीक्षेत ते राज्य विक्रीकर निरीक्षक (मंञालय) महाराष्ट्र शासन, आणि सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO) या पदाला पाञ ठरत या दुहेरी प्रशासकीय पदाला गवसणी घातली आहे. नुकतीच एमपीएससी परिक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाली, त्या यादीत ते 37 व्या रँकने राज्य विक्रीकर निरीक्षक (मंञालय) महाराष्ट्र शासन व सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO) या पदासाठी व पात्र ठरले आहेत. अशा प्रकारे 2024 या वर्षात त्याने एमपीएससी परीक्षेमधून दुहेरी पदांना गवसणी घातली आहे.
जुनैद काझी यांंचे प्राथमिक शिक्षण तेरणा पब्लिक स्कुल धाराशिव येथे झाले तर महाविद्यालयीन शिक्षण दयानंद काँलेज लातूर येथे झाले. डि.वाय.पाटील इंजिनीरिंग काँलेज, पुणे येथे बी.ई.मँकँनिक तर त्यांनी एमटेक पर्यंतचे शिक्षण गव्हर्मेंट इंजिनिरिंग काँलेज पुणे येथे झाले.
जुनैदचे वडील नासेर काझी यांचे शिक्षण एम.एस. डब्लू पर्यंत झाले असून ते सध्या शेती करतात. जुनैदने जिद्द व चिकाटीने अभ्यास करून आईवडिलांच्या कष्टाचे चीज केले.
पदवी नंतर लगेच नोकरी उपलब्ध नसल्याने करिअरचा मोठा प्रश्न होता. स्पर्धा परीक्षांबद्दल जुजबी माहिती होती. स्पर्धा परीक्षांबद्दल अधिक माहिती आणि पूर्वतयारी करावी म्हणून पुण्यातच अभ्यासाला सुरुवात करीत एमपीएससी परिक्षेचा सातत्यपूर्ण अभ्यास केला.
ते राज्यसेवा मुख्य,राज्य विक्रीकर निरीक्षक, सहाय्यक कक्ष अधिकारी या परीक्षा देत राहिले. दरम्यान या प्रवासात अनेकदा अपयशाला सामोरे जावे लागले पण 2024 या वर्षी मात्र त्याने यशाचे शिखर सर केले.
भव्य मिरवणूक व ग्रामपंचायतच्या वतीने नागरी सत्कार
या यशानंतर काटी ग्रामस्थांच्या वतीने गुरुवार दि. 18 रोजी जुनैद काझी यांची येथील बसस्थानक ते बाजार चौकापर्यंत भव्य मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा केला तर काटी ग्रामपंचायतच्या वतीने शुक्रवार दि. 19 रोजी विविध मान्यवर, ग्रामस्थांच्या उपस्थितीत जुनैद व वडिल नासेर काझी यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच पती व सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा शिवसेना उबाठा गटाचे कार्यकर्ते सुजित हंगरगेकर,माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, माजी सरपंच शामराव आगलावे, अशोक जाधव,माजी उपसरपंच जुबेर शेख, प्रदीप साळुंके, प्रकाश गाटे, रामेश्वर लाडुळकर, वसंत हेडे, भैरी काळे,सत्यजित देशमुख, शिवलिंग घाणे, कय्युम कुरेशी,धनाजी गायकवाड,अमोल गावडे, रावसाहेब देशमुख,राजु वाडकर,दादाराव कांबळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments