काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील लोकमंगल मल्टीस्टेटच्या वतीने शुक्रवार दि.19 रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत काटीचे सुपुञ जुनैद नुसरत नासेर काझी याने 2024 मध्ये दिलेल्या एमपीएससी परीक्षेत राज्य विक्रीकर निरीक्षक व सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO) या प्रशासकीय पदाला पाञ ठरत या दुहेरी प्रशासकीय पदाला गवसणी घातली. व त्याची राज्य विक्रीकर निरीकक्ष (मंञालय)महाराष्ट्र शासन या पदावर निवड झाली. तसेच विशाल विजय खरात याची यांची महावितरण कनिष्ठ सहाय्यक अधिकारी पदावर निवड झाली तर ऐश्वर्या त्रिगुणशील साळुंके यांनी एमबीबीएस डॉक्टर पदवी प्रधान केल्याबद्दल त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजपचे विधानसभा अध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, लोकमंगल मल्टीस्टेटचे विभागीय अधिकारी दिलीप गाजरे, माजी सरपंच आदेश कोळी,नासेर काझी, सयाजीराव प्रतापराव देशमुख,अनिल गुंड,मकरंद देशमुख, गोकुळ सोनवणे, विजय खरात,ञिगुणशिल साळुंके आदींसह लोकमंगल मल्टीस्टेटचे कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments