Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी परिसरात ढगफुटी सदृश पाऊस; काढणीस आलेल्या व काढून पडलेल्या पिकांचे अतोनात नुकसान


काटी/उमाजी गायकवाड
 तुळजापूर तालुक्यातील काटीसह परिसरात सोमवार दि. 22 रोजी दुपारी अडीच्या सुमारास ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने शेतातील उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने उभ्या पिकात पाणी थांबल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. सततच्या धुवाधार पावसाने काटीसह परिसरातील तलाव,ओढे, नदी-नाल्यांना पूर आला आहे.

उडीद,बाजरी,मुग,सोयाबीन या पिकांची काढणी सुरू असताना काटी परिसरात सोमवारी झालेल्या ढगफुटी सदृश पाऊसामुळे अतोनात नुकसान झाले आहे. 

यंदा शेतक-यांना चांगले उत्पन्न होईल अशी आशा होती. शेतक-यांनी खरीपातील पेरणी उसनवारी करुन बी बियाणे खरेदी केली होती. मात्र, काढणीला आलेले सोयाबीन,उडीद पिक शेतक-याला पावसाने काढता आले नाही. तर काढणी करुन ठेवलेले उडीद अचानक ढगफुटी सदृश्य जोरदार पाऊस आल्याने शेतकर्‍यांच्या सोयाबीन,कांदा मका,ऊस,उडिद, बाजरी,तुर अशा सर्वच पिकांना फटका बसला आहे.

सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने पिकेही चांगली आली होती. पिके काढणीला सुरुवात झाली असताना पावसाने हैदोस घातल्याने आलेले उत्पन्न ऐन तोंडात भरवायला आलेला घास पावसाने हिरावून नेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. सोयाबीन, कांदा,उडिद, पिकात पाणी साचल्याने तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे.काही शेतक-यांचा उडिद, सोयाबीन बाजारात गेला असून काही शेतकऱ्यांचा पाण्यात भिजत आहे.काटी परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या  पिकांचे नुकसान झाले आहे. काढणी केलेली पिके पाण्यात भिजत आहेत.या पिकांचे तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Post a Comment

0 Comments