"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
काटी| उमाजी गायकवाड
जिद्द, चिकाटी आणि अभ्यासातील सातत्य यांच्या जोरावर तुळजापूर तालुक्यातील काटी येथील सुपुत्र अब्दुलहादी मुदस्सर काझी याने दहावीच्या परीक्षेत ९७.४० टक्के गुण मिळवून यशाचे शिखर सर केले आहे. त्याच्या या घवघवीत यशामुळे काटी गावासह संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात त्याचे कौतुक होत आहे.
अब्दुलहादी याने धाराशिव येथील नामांकित 'भोसले हायस्कूल'मध्ये आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार असलेल्या अब्दुलादीने या परीक्षेत प्रत्येक विषयात आपली छाप पाडली आहे. विशेष म्हणजे त्याने संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून आपली विद्वत्ता सिद्ध केली, तर गणित विषयात ९९ आणि इंग्रजी विषयात ९६ गुण प्राप्त करून त्याने गणिताची आणि भाषेची सांगड उत्तम घातली आहे.
अशी आहे गुणतालिका:
मराठी: ८९
संस्कृत: १००
इंग्रजी: ९६
गणित: ९९
विज्ञान: ९२
समाजशास्त्र: ९०
अब्दुलहादी हा मुदस्सर (बबलू)अब्रार काझी यांचा मुलगा असून, त्याच्या या यशात त्याच्या आई-वडिलांचे पाठबळ आणि भोसले हायस्कूलमधील शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. कोणत्याही प्रकारचा ताण न घेता, नियोजित वेळेत अभ्यास केल्यामुळेच हे यश संपादन करता आले, अशी भावना अब्दुलादीने व्यक्त केली आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जर मनाशी जिद्द बाळगली, तर ते कोणत्याही स्पर्धेत मागे राहत नाहीत, हेच अब्दुलादीने आपल्या निकालातून दाखवून दिले आहे. त्याच्या या यशाबद्दल परिसरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.
0 Comments