Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तरुणांनी बालविवाह रोखणे गरजेचे डॉ.राजेंद्र गणापूरे

मुरुम/प्रतिनिधी
भारत देश अधिक सक्षम करण्यासाठी तरुणांचे नेतृत्व महत्वाचे आहे. हे नेतृत्व राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत विकसित होते. या विकसित नेतृत्वामुळेच खऱ्या अर्थाने समाजातील अनिष्ठ, प्रथा, परंपरा व बालविवाह प्रतिबंध रोखता येऊ शकतो. ते रोखण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा, असे मत अर्थशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. राजेंद्र गणापूरे यांनी केले. नाईक नगर, ता. उमरगा येथे श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित विशेष वार्षिक शिबिरात बालविवाह जनजागृती काळाची गरज या विषयावर शनिवारी ( ता.१०) रोजी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.

या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. महादेव कलशेट्टी होते. यावेळी डॉ. नागोराव बोईनवाड, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. प्रतापसिंग राजपूत, डॉ. प्रकाश कुलकर्णी, प्रा.अजिंक्य राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप डॉ. महादेव कलशेट्टी यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. शिला स्वामी यांनी केले. सूत्रसंचलन प्रा. अशोक बावगे तर आभार डॉ. विलास खडके यांनी मानले. यावेळी बहुसंख्येने विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.                           

नाईक नगर, ता. उमरगा येथे आयोजित व्याख्यानाप्रसंगी डॉ. राजेंद्र गणापूरे बोलताना डॉ. महादेव कलशेट्टी, प्रा. अशोक बावगे, डॉ. प्रतापसिंग राजपूत व अन्य.
           

Post a Comment

0 Comments