Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

जिल्हा परिषद केंद्रीय शाळा डाळिंब येथे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

येणेगूर/प्रतिनिधी 
उमरगा तालुक्यातील डाळिंब येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शनिवार दि.10 रोजी उमरगा तालुक्यातील डाळींब येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत  इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेचे मुख्याध्यापक कोकळगावे अब्दुलकादर यांच्या आयोजनानुसार विविध कला गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केले. 

कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले प्रतिमेच्या पुजन सरपंच रंजनाताई सातपुते,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आयेशाताई जेवळे, उपाध्यक्ष जीवन केंगार यांच्या हस्ते करून उद्घघाटन गावचे उपसरपंच हिराजी गायकवाड पत्रकार तथा शिक्षण तज्ञ अस्लम 
सेडम वाले, विस्ताराधिकारी राजेंद्र कानडे यांच्या हस्ते झाले. 

प्रमुख पाहुणे म्हणून खयुम चाकुरे, जब्बार पटेल, शिवानंद शिरोळे, बालाजी सातपुते, नदीम मुगळे, बालाजी टिकंबरे महादेव घंटे उपस्थित होते.

या स्नेहसंमेलनात मराठमोळ गाणं, जय हो, रंग दे बसंती, लुंगी डांस, मला आमदार व्हायचंय अशी आणि गाणी कलाकार भक्ती हळूरे, दूर्वा लवटे, सायली फडताळे, दीक्षा मुगळे, प्रतीक्षा गायकवाड, सदफ शेख, लक्ष्मी पाटील, सानिका देवकते अल्तमास शेख, अभिषेक जाधव, मिसबा शेख यांनी उत्कृष्ट रित्या नृत्य गायन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
हा कार्यक्रम  यशस्वीतेसाठी  शाळेतील या शिक्षक व शिक्षिका शर्मिला कुलकर्णी, वैशाली ढेरे, आशा माने, सुनिता पोतदार, शुद्ध मत्ता भोसले, रत्नमाला सगर, बालाजी कवठे, जमाल पाशा खैराटे, प्रवीण शिंदे परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाचे नियोजन सूत्रसंचालन व चित्रीकरण श्री धनराज फुरडे, गोविंद जाधव यांनी केले.व कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व  ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा.....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, तुळजापूर/काटी
9923005236

Post a Comment

0 Comments