काटी:- तुळजापूर तालुक्यातील काटी येथील मथुराबाई नागनाथ खरात वय (90) वर्षे यांचे शनिवार दि. 10 रोजी रात्री 11 वाजता धाराशिव येथील त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले. त्या काटी येथील नागनाथ मंदीराचे पुजारी नागनाथ खरात यांच्या पत्नी तर ज्ञानेश्वर, सिध्देश्वर व महादेव खरात यांच्या मातोश्री होत्या.
त्या पार्थिवावर रविवारी सकाळी 9 वाजता धाराशिव येथील कपिल धारा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या तीन मुले, दोन मुली, सुना,नातवंडे असा परिवार आहे.
0 Comments