Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

अनेक वर्षांची परंपरा असलेल्या व निसर्गाशी नाती जपणारी वेळ अमावस्या काटीसह सावरगाव, तामलवाडी, दहिवडी, वडगाव (काटी), केमवाडी, खुंटेवाडी, वाणेवाडी परिसरात उत्साहात साजरी

                          डॉ. अविनाश ढगे, काटी 

काटी/उमाजी गायकवाड
 काळ्या आईला सजविण्याचा व खाऊपिऊ घालण्याचा सण म्हणून गेल्या अनेक वर्षांची परंपरा असलेल्या व निसर्गाशी नाती जपणारी येळवस   अर्थात वेळा अमावस्या हा सण  काटीसह सावरगाव,तामलवाडी, दहिवडी,वडगाव (काटी), केमवाडी,खुंटेवाडी,वाणेवाडी परिसरात बळीराजांकडून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

माजी पंचायत समिती सदस्य तथा सन ग्रुपचे संजय देशमुख व अमरसिंह  देशमुख फॅमिली काटी 
शेतातील लक्ष्मीचे डोहाळे जेवण म्हणून ही वेळ आमोशा खास करून उस्मानाबाद व लातूर जिल्हात साजरी केली जाते. मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्याला 'येळवस' असेही म्हटले जाते. दर्श अमावस्या किंवा वेळा आमावस्या ही खरीप पेरणीनंतर येणारी सातवी अमावस्या असते.

          पत्रकार उमाजी गायकवाड, काटी 
या सणानिमित्त परिसरातील शेतकरी बांधवांनी आपापल्या शेतात जाऊन वनभोजनाचा आनंद घेतला. मार्गशीर्ष महिन्याची दर्शवेळा अमावास्या हा ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक आणि वन भोजनाचा आनंद देणारा सण आहे. ग्रामीण भागात येळवशीला शेतकरी व शेतीशी निगडित सर्व कुटुंबीयासह मित्रमंडळी , नातेवाईक हजेरी लावतात.  या सणाला विशेष करुन मित्र व नातेवाइकांना वनभोजनासाठी आमंत्रित केले जाते. गुरुवार दि. 11 रोजी सकाळपासूनच गावातून व शहरातून शेताकडे येणाऱ्या सर्वच रस्त्यांवर गर्दी दिसत होती. ग्रामीण  भागात दिवसभर शुकशुकाट दिसत होता.

                     रविराज कापसे, सिंदफळ 

शेतकऱ्यांनी सकाळी कडब्याची खोप करून पाच पांडवांची पूजा केली. गहू, हरभरा, ज्वारी आदी पिकांमध्ये आंबिल शिंपून हंगाम चांगला होऊ दे अशी प्रार्थना यावेळी लक्ष्मी चरणी करण्यात आली. सायंकाळी उत्तरपूजा केली करण्यात आली. 

                            सुनिल परिट, काटी 
त्यानंतर बालगोपाळांसह महिलांनीही येळवशीला भज्जी ,बाजरी भाकरी, बाजरीचे उंडे ,खीर, धपाटे ,तिळाची पोळी, पिठापासून  बनवलेले आंबील या रानमेव्यासह घरगुती  पदार्थां व्यतिरिक्त फरसाण , मिठाई, फळे यांचाही वनभोजनात समावेश दिसून आला. रानमेव्याचा आस्वाद घेतला. तसेच बालगोपाळानी हरभऱ्याच डहाळे, बोरे, पेरू, ऊस यांचा पुरेपूर आस्वाद घेतला.

राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, काटी 

                         साळुंके, काटी त्रिगुणशिल

     प्रसाद खामकर, तुळजापूर

                  ज्ञानेश्वर जगताप, तामलवाडी 

                 विठ्ठल नरवडे सर पिंपळा फॅमिली 

ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा.....
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236

Post a Comment

0 Comments