Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

निसर्गाशी नाते घट्ट करणारी व आपुलकीची ऊब देणारी वेळ अमावस्या काटी, सावरगाव, तामलवाडी परिसरात साजरी

काटी/उमाजी गायकवाड
मराठवाड्याच्या सांस्कृतिक श्रीमंतीचा प्रत्यय देणारा वेळ अमावस्या हा सण तामलवाडी परिसरात उत्साहात साजरा झाला  . निसर्गाच्या सहवासात आपल्या माणसासोबत हा दिवस  एक वेगळी ऊर्जा देऊन जातो. कोणत्याही पुराणात किंवा इतिहासात नसलेला मात्र शेकडो वर्षाचा परंपरा असलेला हा आगळावेगळा सण म्हणजे वेळ अमावस्या.या सणाला हिरवाईचा अपूर्व सोहळा असं म्हटलं जातं . भारतीय सणांचा वरचेवर होत असणारे विकृतीकरण आणि पर्यावरणाची हानी पाहता वेळ अमावस्या हा सण शेतीशी मातीशी व निसर्गाशी नाते घट्ट करतो .

रब्बी हंगामातील पिके जेव्हा भरून येतात तेव्हा शेतातील काळ्या आईचे ऋण फेडण्यासाठी आज तिची मनोभावे पूजा  हा त्यामागील शुद्ध भाव .धरणी मातेची ओटी भरून पांडवाची पूजा केली जाते .
पाच पांडव व द्रौपदीचे पूजन करतात.

पत्रकार उमाजी गायकवाड, काटी 
सर्वजण या सणाच्या निमित्त एक दिवस निसर्गात फिरून ,जेवणाचा आनंद ,पोहणे -खेळणे , खेळणे बागडणे, गप्पागोष्टी ,मौजमजा यात घालवतात. पण हेच आनंदाचे क्षण वेचत प्रत्येकांसाठी हा दिवस संस्मरणीय ठरतो .या मोसमात रंगीत फुलांचा मुकुटासह नटलेला करडा,कापणीसाठी आली तूर , परिपक्व झालेला हरभरा,हवेच्या तालावर नाचणारा गहू  ,पाखरांना खुणावणारी पोटऱ्यातील ज्वारी , फळांनी बहरलेली बोरांची झाडे , असा चोहीकडे दिसणारा हिरवागार आणि प्रसन्न निसर्ग असतो.अशा वातावरणात ऊन, वारा,पाऊस या निसर्गशक्तीसमोर नतमस्तक होऊन केलेली ही पूजा म्हणजे शेतकरी आणि निसर्गाची शतकानूशतके चालत असलेली भागीदारीच दर्शवते . याप्रसंगी विठ्ठल नरवडे, ज्ञानेश्वरी नरवडे ,नरवडे नागनाथ,उत्तम नरवडे, साळू नरवडे, दत्ता नरवडे, गीता नरवडे ,महादेव नरवडे , कुबेर नरवडे,मोनिका नरवडे, वेदांत नरवडे  नारायणी प्रथमेश, वरदायिनी, जयतीर्थ यासह परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.

                           गायकवाड फॅमिली काटी

Post a Comment

0 Comments